हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

देऊळगाव राजाची प्रतिष्ठेची लढाई! माजी-विद्यमान आमदारांची थेट कसोटी, २९ हजार मतदार ठरवणार निकाल

On: December 21, 2025 9:54 AM
Follow Us:
देऊळगाव राजा नगरपालिका निवडणूक 2025 मतदान प्रक्रिया
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

देऊळगाव राजा/प्रा.दिलीप‌ नाईकवाड

देऊळगाव राजा नगरपालिका निवडणूक 2025 आज अत्यंत अटीतटीची आणि प्रतिष्ठेची ठरली आहे. देऊळगाव राजा नगरपालिका निवडणूक 2025 मध्ये माजी आमदार आणि विद्यमान आमदार यांच्यातील राजकीय प्रभावाची खरी कसोटी पाहायला मिळत आहे. देऊळगाव राजा नगरपालिका निवडणूक 2025 च्या माध्यमातून तब्बल २९ हजारांहून अधिक मतदार नगराध्यक्षासह ८० उमेदवारांचे भवितव्य ठरवत आहेत. या देऊळगाव राजा नगरपालिका निवडणूक 2025 कडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सिंदखेडराजा मतदारसंघातील देऊळगाव राजा नगरपालिका ही जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाची आणि चर्चेतील निवडणूक ठरली आहे. न्यायालयीन आदेशामुळे पुढे ढकलण्यात आलेली ही निवडणूक अखेर आज पार पडत असून कालपर्यंत शहरात प्रचाराचा प्रचंड धुरळा उडालेला दिसून आला. माजी आमदार आणि विद्यमान आमदारांनी प्रत्यक्ष प्रचारात उडी घेतल्यामुळे या लढतीला अधिकच प्रतिष्ठेचे स्वरूप आले आहे.या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ३ उमेदवार तर नगरसेवक पदासाठी ७७ उमेदवार रिंगणात असून एकूण १० प्रभागांमध्ये ३० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. देऊळगाव राजा नगरपालिकेत एकूण २९,३२६ मतदार असून त्यामध्ये १४,८५४ पुरुष आणि १४,४७२ महिला मतदारांचा समावेश आहे.

या निवडणुकीत ऐनवेळी पक्षप्रवेश, उमेदवारीतील बदल आणि सतत बदलणारी राजकीय समीकरणे यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. लक्ष्मीदर्शनाचा प्रभाव कितपत रोखता येतो आणि निवडणूक यंत्रणा किती प्रभावी ठरते, यावरच या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हे पण वाचा..

शेतात काम करत असताना शेतकऱ्यावर भरदिवसा बिबट्याचा हल्ला.

२१ डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर देऊळगाव राजा नगरपालिकेतील सत्तेचे गणित स्पष्ट होणार असून या निवडणुकीतून केवळ उमेदवारच नव्हे तर स्थानिक राजकीय नेत्यांच्या प्रभावाचेही खरे चित्र समोर येणार आहे.


👉 वाचकांसाठी आवाहन: आपला मतदानाचा हक्क बजावा आणि स्थानिक राजकारणाच्या ताज्या, विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.

📰 Related News: सिंदखेडराजा मतदारसंघातील इतर नगरपालिका निवडणुका | बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय घडामोडी | मतदान व मतमोजणी अपडेट्स.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

बुलढाण्यात पत्रकार परिषदेत एप्सटीन फाइल प्रकरणावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर

Epstein Files प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; “ब्लॅकमेल होणारा पंतप्रधान देशासाठी धोकादायक”

Congress protest in Chikhli against LPG gas cylinder price hike women cooking on traditional stove

चिखलीत गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; तहसीलदारांना घेराव, महिलांनी चुल पेटवून केला संतापाचा निषेध

Gram Panchayat computer operators protest in Mumbai

मुंबई आंदोलनस्थळी आमदार श्वेताताई महाले पाटील; संगणक परिचालकांच्या प्रश्नांवर दिले मोठे आश्वासन

चिखला काकड येथे शिवाजी महाराज पुतळा वादामुळे निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती

चिखला काकड पुतळा वाद पेटला; शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख जयश्री कायंदे यांचा राजीनामा

चिखली नगर परिषद विजयी महिला नगरसेविकांचा सत्कार सोहळा

चिखली नगर परिषदेत विजयी महिला नगरसेविकांचा भव्य सत्कार; स्त्रीशक्तीच्या नेतृत्वाचा गौरव

Leave a Comment