हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अवैध मुरूम उत्खननावर कारवाईला हिंसक विरोध; कारवाईस गेलेल्या तहसीलदारांच्या पथकाला धमकी, मेहकर पोलिसांत गुन्हा दाखल.

On: December 13, 2025 4:25 PM
Follow Us:
लोणार तालुक्यात अवैध मुरूम उत्खननावर कारवाई करताना तहसीलदारांच्या पथकाला धमकी देणाऱ्या आरोपींची पोलिस कारवाई

लोणार/विनायक कुटे

लोणार : लोणार तालुक्यातील बोरखेडी शिवारात अवैध मुरूम उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या पथकाला धमकी देत मंडळ अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याची गंभीर घटना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी संतोष प्रकाश पनाड यांच्या फिर्यादीवरून मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणार तहसीलदार भूषण पाटील, नायब तहसीलदार मयुर इप्पर, मंडळ अधिकारी लक्ष्मण सानप आणि महसूल अधिकारी संतोष पनाड हे बोरखेडी परिसरात अवैध मुरूम उत्खननाची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यासाठी गेले होते.
बोरखेडी गावातून पारडी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत जेसीबीच्या सहाय्याने गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.कारवाईदरम्यान रंगनाथ गाडे आणि जेसीबी चालक हे मुरूम भरून टिप्पर व हायवा वाहनात टाकताना आढळले.
त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता काही वेळातच आकाश गाडे, उमेश गाडे आणि त्यांच्यासोबत आठ ते दहा जण घटनास्थळी आले. त्यांनी मंडळ अधिकारी लक्ष्मण सानप यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली तसेच शासकीय पथकाला जीवे मारण्याची धमकी दिली.
इतकेच नव्हे तर पथकाचे वाहन अडवण्यासाठी टिप्परमधील मुरूम रस्त्यावर टाकून मार्ग रोखण्यात आला. ‘वाहनांना हात लावून दाखवा, एकेकाला पाहून घेऊ’ अशा धमक्या देत आरोपींनी उत्खननासाठी वापरलेली जेसीबी, टिप्पर आणि इतर वाहने घटनास्थळावरून पळवून नेली.विशेष म्हणजे याच परिसरात ९ डिसेंबर रोजीही अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या एका टिप्परवर तहसीलदारांनी कारवाई करत १ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. तरीदेखील अवैध उत्खनन सुरूच असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.
हे पण वाचा..मोताळ्यात दुचाकीचा भीषण अपघात; नगरसेविकेच्या मुलाचा जागीच मृत्यू व पादचारी गंभीर जखमी.

मेहकर पोलिसांनी या प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तसेच भारतीय दंड संहिता २०२३ अंतर्गत शासकीय कामात अडथळा, धमकी, चोरी आणि रस्ता अडवून गोंधळ निर्माण केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून एक जेसीबी आणि एक टिप्पर जप्त करण्यात आला आहे. उर्वरित वाहनांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक अवचार यांनी दिली.

👉 हे आवश्य करा..

महाराष्ट्रातील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या घडामोडी व विविध योजनांच्या माहितीसाठी आत्ताच kattanews.in या नंबर १ च्या मराठी न्यूज नेटवर्क ला फॉलो करा…

Related News

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment