हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
हवामान विभागाचा इशारा! पुढील 24 तास घराबाहेर पशेतकऱ्यांनो सावधान! महाराष्ट्रात येलो अलर्ट देऊळगाव राजात तलवारीने केक कापून वाढदिवस साजनांदुरा: पुरवठा निरीक्षण अधिकारी पुनम थोरात “चिखली नगराध्यक्षपद शिंदे सेनेला द्या, बदल्य‘समृद्धी’वरील सोन्याची लूट! पोलिसांकडून आरो

खामगावमध्ये निवडणुकीपूर्वी धक्का! मतदारांना थेट पैसे वाटप सुरू – ५० हजार जप्त, 3 जण पसार

On: December 2, 2025 1:27 PM
Follow Us:
खामगाव पैसे वाटप प्रकरणात ५० हजारांची रोकड जप्त – भरारी पथकाची कारवाई

खामगाव/प्रतिभा जगदने

खामगाव पैसे वाटप प्रकरणात सोमवारी मोठी कारवाई झाली असून
खामगाव पैसे वाटप प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
निवडणुकीपूर्वी मतदारांना प्रलोभन देण्यासाठी खामगाव पैसे वाटप करत असल्याची माहिती मिळताच भरारी पथकाने धाड टाकली.या धाडीमध्ये तब्बल ५० हजारांची रोकड जप्त झाली असून
खामगाव पैसे वाटप करत पळून गेलेले तिघे आरोपी अद्याप फरार आहेत.खामगाव शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील महेबूब नगर येथे सोमवारी दुपारी थेट पैसे वाटप सुरू असल्याची धक्कादायक माहिती प्रशासनाला मिळाली. घरकुल परिसरातील एका ठिकाणी नागरिकांना रोख रक्कम देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसताच भरारी पथक तातडीने पोहोचले. पथकाने छापा टाकताच संबंधित तिघांनी पळ काढला, मात्र घटनास्थळावर ५० हजारांची रक्कम आढळून आली.हे पण वाचा..साप्ताहिक राशीभविष्य 2025 (Weekly Horoscope) – या आठवड्याचे सर्व राशींचे संपूर्ण भविष्य.भरारी पथकातील आचारसंहिता नोडल अधिकारी बाळासाहेब व्यवहारे व तलाठी नागरे यांनी तातडीने पंचनामा करत ही रक्कम जप्त केली. निवडणुकीदरम्यान मतदारांना रोख रक्कम वाटणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे पोलिसांनी आरोपी कोणत्या पक्षाशी किंवा उमेदवाराशी संबंधित आहेत याचा सखोल तपास सुरू केला आहे.या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी निवडणूक आयोगाने अधिक कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. मतदारांना लालूच देण्याची ही उघड घटना समोर आल्याने शहरातील निवडणूक वातावरण अधिक तापले आहे.

हे पण वाचा.

रेती माफियांना जबर दणका! नायब तहसीलदार सायली जाधव यांची धडाकेबाज कारवाई, दोन वाहने जप्त

“खामगाव शहरातील महेबूब नगरात सोमवारी दुपारी आम्ही कारवाई केली. अज्ञात आरोपी पसार झाले असून जप्त रक्कम कोषागारात जमा केली जाईल,” असे नोडल अधिकारी व्यवहारे यांनी सांगितले.


👉 तुमच्या परिसरातील निवडणुकीसंबंधी घटना किंवा अपडेट्स आमच्याशी शेअर करा – Katta News तुमचा आवाज पोहोचवेल!


RELATED NEWS

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!