नारायणराव पाटील/ प्रतिनिधी
रिसोड – सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत मोनिका अजित गवई यांना त्यांच्या महिला सशक्तीकरणासाठी केलेल्या कार्याबद्दल आदर्श महिला उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले. सौ. मोनिका यांनी जिल्ह्यातील महिलांसाठी स्वयंरोजगार प्रकल्प सुरू करून सॅनिटरी नॅपकिन उत्पादनाचा व्यवसाय वाढविला आणि प्रत्येक गावातील महिलांपर्यंत पोहोचवला. त्यांनी महिलांना रोजगार मिळवून देण्यासोबतच आरोग्याबाबत मार्गदर्शन देत समाजात मोठे योगदान दिले.वानवडी, पुणे येथील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात झालेल्या सन्मान सोहळ्यात मोनिका अजित गवई यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील काजी हैदर शेख, तेरावे वंशज सोहेल शेख, कोळी नटसम्राट राजेश खर्डे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बहुजन भुमी संघटना आणि दक्ष पोलीस पत्रकार सहकार सेना संघाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.सौ. मोनिका यांचा पती अजित कैलास गवई यांनाही त्यांच्या कार्याबद्दल गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास दादा पठारे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा रोहिणी ताई भोसले, राष्ट्रीय उपाध्यक्ष रसीद पठाण, राष्ट्रीय वरीष्ठ अध्यक्ष कीर्ती पांडे, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष पल्लवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.सौ. मोनिका अजित गवई यांच्या कार्यामुळे महिला उद्योजकता आणि स्वयंरोजगार संधी यांना बळकटी मिळाली आहे, तसेच महिला आरोग्यावर लक्ष देत समाजातील महिलांना सशक्त बनवले आहे. हा पुरस्कार आदर्श महिला उद्योजक पुरस्कार म्हणून ओळखला जातो.