हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
रिसोड नगरपरिषदेत QR कोड घोटाळा? ₹70 लाखांचा हिशोलोणार हादरलं! भरधाव मिनीबस ट्रॅव्हल्सने युवकसाताऱ्यात थरार! महिला डॉक्टरच्या आत्महत्येनलोणी यात्रा उत्सवात शिक्षकांकडून करवसुली आदकर्जाच्या विळख्यात अडकलेल्या युवा शेतकऱ्याशेतकऱ्यांनो सावधान! महाराष्ट्रात येलो अलर्ट

जलसंपदाचे अधिकारी एसीत मस्त, पण शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर! रिसोड तालुक्यात संतापाची लाट

On: November 3, 2025 7:04 AM
Follow Us:

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरू पाटील

रिसोड तालुक्यातील कोल्हापुरी बंधारा आणि इतर बंधाऱ्यांमध्ये सध्या लाकडे, काडीकचरा व गाळाचा प्रचंड साठा झाला आहे.
पण हे सर्व साफ करण्याची जबाबदारी असलेल्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजवर कोणतीही कारवाई केलेली नाही.
अधिकारी केवळ खोटी आश्वासने देत एसीच्या थंडीत मस्त बसलेले आहेत, आणि त्याचवेळी शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.

शेतकऱ्यांनी रब्बी पिके पेरताना कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडवले जाईल या विश्वासावर शेती केली.
मात्र, पाणी मिळेल या आशेने दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे.
जलसंपदा विभागाचे अधिकारी चव्हाण यांनी दोन वेळा आश्वासन दिले होते की,
“लाकडे व काडीकचरा लवकरच काढून बंधाऱ्यात गेट बसवून पाणी अडवले जाईल.”
पण आजतागायत त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

याच आधी चिखलीकर आणि जाधव या अधिकाऱ्यांनीही अशीच आश्वासने दिली, पण ती हवेत विरली.
शेतकऱ्यांनी आता कोणावर विश्वास ठेवावा, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे.
विभागाचे बोपचे यांनी “काडीकचरा काढण्यासाठी आर्थिक तरतूद नाही आणि माणसंही नाहीत” असं कारण दिलं.
दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी वरिष्ठांना या संदर्भात पत्र पाठवले गेले, पण आजपर्यंत काहीच निर्णय झालेला नाही.

हे पण वाचा.

रिसोड तालुक्यात बूथ वाढ! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत १६ नवीन मतदान केंद्रांची निर्मिती.

दरम्यान, आसेगाव पेन कोल्हापुरी बंधाऱ्यात अजूनही लाकडे आणि काडीकचरा साचलेले आहेत.
त्यामुळे रब्बी पिकांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध नाही, आणि अनेक शेतकऱ्यांची शेती कोरडी पडली आहे.
“पैनगंगा नदीवर पाणी अडवले असते तर शेती वाचली असती,” अशी भावना शेतकऱ्यांत आहे.

शेतकरी नारायणराव सरनाईक (माजी सरपंच, हिवरापेन) म्हणाले —
“आमची संपूर्ण रब्बी पिके पैनगंगा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
आसेगाव पेन येथे असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यात गेट वेळेवर बसवले तर पाण्याची उपलब्धता राहते.
पण आता तसे झाले नाही. त्यामुळे पिके धोक्यात आली असून आर्थिक नुकसान सोसावे लागेल.
अशी परिस्थिती सुरू राहिली तर शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागेल.”

रिसोड तालुक्यातील ही परिस्थिती केवळ एक उदाहरण नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात
जलसंपदा विभागाच्या निष्क्रियतेचा परिणाम दिसून येतोय.
अधिकारी एसीत बसून योजना फक्त कागदावर राबवतात, आणि दुसरीकडे शेतकरी मात्र
आत्महत्येच्या कुशीत सुखावतोय!

महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या बातम्यांसाठी आजच आपल्या kattanews.in या न्यूज पोर्टलला भेट द्या
© 2025 KattaNews.in | सर्व हक्क राखीव

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!