वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील
washim : दारव्हा तालुक्यातील मौजा चानी कामठवाडा kamthwada येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर कालपासून श्रावण धुमा राठोड हे आमरण उपोषणास बसले त्यावेळी समस्त गावकरी बांधव हे त्यांच्यासोबत उपस्थित होते उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांनी सर्वच ‘महापुरुषांचे’ प्रतिमेचे हार घालून पूजन केले त्यावेळी गावच्या सरपंच्या गजभिये ताई हा सुद्धा उपस्थित होत्या त्यांच्या प्रमुख मागण्या शहरी भागातील घरकुलाप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांना सुद्धा दोन लाख ५० हजार रुपयाचा लाभ देण्यात यावा तर घरकुलाचा पहिला हप्ता १५,००० चा न देता ५० हजार रुपयाचा देण्यात यावा.
आणि ज्या लाभार्थ्याचे नाव घरकुलाच्या यादी मधून नाव सुटले असेल त्या अति गरजू लाभार्थ्यांना त्या यादीमध्ये समाविष्ट करून त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशा प्रमुख मागण्या असून बांधकामावरील घराच्या दिवसेंदिवस या किमती वाढतच आहे ग्रामीण भागामध्ये घरकुलाचे एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचे घरकुल मिळतात ज्यांच्याकडे शौचालय असेल अशा लाभार्थ्यांना १२ हजार रुपये कमी मिळतात तर मस्टरच्या पैशासाठी ही ग्रामीण भागामध्ये चार- चार सहा -सहा महिने वाट पाहावी लागत आहे .अनेक लाभार्थ्यांचे मस्टरचे पैसे येतच नसल्याने ते लाभार्थी भूलूनही जातात तर ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने घरकुलाचे एक लाख वीस हजार रुपये लाभार्थ्याच्या हातात मिळत असल्याचे समजते तर घरकुल बांधकाम करावे की मिस्त्रीला मजुरी द्यायची त्याचे फार मोठे संकट सध्या ग्रामीण भागातील जनतेपुढे आहे.
शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही मटेरियल चे भाव सारखेच आहे मिस्त्री ची मजुरी ही सारखीच आहे मग ही एवढी मोठी तफावत का यासाठीच चाणी येथील माजी उपसरपंच हे आपले गावातील ग्रामपंचायत कार्यालय समोर आपल्या मागण्या पूर्ण कराव्या आणि ग्रामीण भागातील सामान्य गोरगरीब जनतेला न्याय द्यावा त्यासाठी मी उपोषणाला बसलो आहे तसेच प्रत्येक गावागावामध्ये ग्रामसभेचा ठराव घेऊन ग्रामीण भागातही दोन लाख ५० हजार रुपयाचे घरकुल देण्यात यावे असा ठराव प्रत्येक ग्रामपंचायत घ्यावा असे आव्हान यावेळी श्रावण धुमा राठोड shravan dhuma rathod यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले न्याय मिळेपर्यंत मी आमरूण उपोषण सोडणार नाही असे त्यांनी सांगितले