
वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील
washim : रिसोड risod विधानसभा मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षाची निवडणुकी संदर्भात माहिती देण्यासाठी रिसोड ‘विधानसभा’ निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांच्या अध्यक्षतेखाली व सहकारी प्रतीक्षा तेजनकर तहसीलदार पुंड यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयातील सभागृहात आज दिनांक २० ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी संपूर्ण माहिती देण्यात आली.
त्यामध्ये नामनिर्देशन पत्र दिनांक २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी १ ते ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय रिसोड तहसीलदार यांचे दालनात स्वीकारण्यात येतील सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणतेही नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाही यामध्ये शपथपत्राचा नमुना दिनांक २२ ऑक्टोबर २९ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मिळेल उमेदवारास कमीत कमी एका प्रस्तावाने किंवा सूचकांनी स्वतः उपस्थित राहून नामनिर्देशन पत्र दाखल करणे आवश्यक आहे एका विधानसभा क्षेत्रात दोन अर्ज पेक्षा जास्त अर्ज घेता येणार नाही एका विधानसभा मतदारसंघात चार पेक्षा जास्त अर्ज स्वीकारता येणार नाहीत. शपथपत्राशिवाय कोणताही अर्ज पूर्ण होणार नाही याबाबतची प्रत्येक उमेदवाराने दखल घेणे आवश्यक आहे.
नामनिर्देशन दाखल करतेवेळी उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे समक्ष शपथ घेणे आवश्यक आहे किंवा क्षम प्राधिकार्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. कोणत्याही उमेदवारावर ज्या केसेस आहेत किंवा आरोप झालेत इत्यादी पेपर मध्ये त्या उमेदवारास तीन वेळा याबाबतची जाहिरात देऊन खुलासा करणे आवश्यक आहे इत्यादी माहिती आज राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ३३-रिसोड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांनी दिली आहे.