Washim : मराठा सेवा संघ च्या वतीने गुणवंताचा सत्कार व संवाद बैठकीचे आयोजन.

 

 

वाशीम जिल्हा प्रतिनिधी /नारायणराव आरु पाटील

 

२६ सप्टेंबर रोजी मराठा सेवा संघ चे रिसोड तालुकाध्यक्ष शिवाजी कवर यांचे निवासस्थानी मराठा सेवा संघाची संवाद बैठक पार पडली..बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.जानराव देशमुख सर तर प्रमूख उपस्थितांमध्ये जिल्हाउपाध्यक्ष विजय बोरकर ,तालुकाध्यक्ष शिवाजी कवर , बाजार समिती संचालक रविभाऊ चोपडे, सामाजिक कार्यकर्ते संजय सदार होते.या वेळी विविध सामाजिक ,शैक्षणिक ,शेतकरी चळवळ व शेतकऱ्यांच्या समस्या या विषयांवर चर्चा झाली आणि मराठा सेवा संघाचे कार्य खेड्यापाड्यात पोचावे यासाठी गावपातळीवर संवाद बैठकीचे आयोजन करण्याचे ठरले.

 

 

या बैठकीच्या निमित्ताने विविध सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी निवड झाल्याबद्दल भूमिपुत्र संघटनेचे विष्णुपंतजी भूतेकर यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.सवड येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले श्री संतोष सपकाळ सर यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक पॅनल तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबददल व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मध्ये जि.प.शाळा सवड तालुक्यातून प्रथम आल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करून सत्कार केला.

 

 

 

तसेच MBBS साठी शासकीय महाविद्यालयात निवडीबाबत कु. आदिती तोडकर, हर्षल साबळे, आदित्य बेंडवाले या गुणवंत विद्यार्थ्यांचा या वेळी मराठा सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.. मराठा सेवा संघाचे सक्रीय पदाधिकारी शिवश्री सचिन देशमुख सर यांचा वाढदिवस असल्याने त्यांना याप्रसंगी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.बाजार समिती सभापतीपदी निवडीबाबत सत्कार करत असताना शेतकऱ्यांचे बाजार समितीतील समस्याबाबत चर्चा झाली.यानिमित्ताने आपण शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे विष्णुपंत भुतेकर यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

 

 

 

यावेळी या संवाद बैठकीसाठी दिनकर बोडखे, सुभाष खानझोडे, भिंगे सर, संतोष बिल्लारी, साबळे सर, तोडकर सर, बेंडवाले सर, साईनाथ शिंदे, सतिश नरवाडे, विजय साखरे, रंगनाथ गव्हाणे, अमोल मोरे, पंजाब नरवाडे, सुजित राठोड, संदीप कोकाटे, उमाकांत कष्टे, राजेश काळबांडे, होडगर सर, रुद्रप्पा चवरे, गजानन देशमुख, सतिश मोरे, हिम्मत गवळी, आनंद गालटे, मोहन घोटे यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलिप भिसडे सर यांनी तर आभार अमोल बोडखे सर यांनी मानले.