बुलडाणा: लोकनेते प्रशांतभाऊ वाघोदे बुलडाणा विधानसभा निवडणूक लढविणार.

Buldhana

 

 

सागर बोदडे/मोताळा,प्रतिनिधी 

 

दि/०९/१० /२०२४ स्थळ विश्रामगृह बुलडाणा येथे वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा विधानसभा निवडणूक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मध्ये प्रामुख्याने,वंचित चे जिल्हा नेते, समाजभुषण, प्रशांतभाऊ वाघोदे यांनी पक्ष निरिक्षक तथा महाराष्ट्र निवडणुक समन्वय समिती सह अध्यक्ष आद. धैर्यवर्धन फुंडकर साहेब तसेच घाटाखालील निरिक्षक आद प्रदिपजी वानखेडे यांच्या कडे पक्षातर्फे निवडणुक लढण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

 

 

जिल्ह्यातील बहुजन समाजातील, सर्व बहुजन वादी,मायक्रो ओबिसी, बुद्धिस्ट,समाजातील लोकांची ही मागणी आहे की,आद.प्रशांत भाऊ वाघोदे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी….पक्षश्रेष्ठी आद. बाळासाहेब आंबेडकर हे काय निर्णय घेतात या कडे संपुर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. वंचितांच्या न्याय हक्कांसाठी व्यवस्थेला थेट भिडणारा नेता,आंदोलन सम्राट,अभ्यासु,आक्रमक नेतृत्व, कायद्याचं पुर्ण ज्ञान असलेला नेता.म्हणुन आद प्रशांतभाऊ वाघोदे यांची ख्याती आहे. अशी माहिती वंचित चे तालुका प्रसिद्धी प्रमुख सागर बोदडे यांनी दिली आहे.