खडकी ढंगारे गावाजवळील लहान पूलावरुन मोटरसायकल गेली वाहून.

 

नारायणराव आरू पाटील,वाशिम/प्रतिनिधी

 

रिसोड तालुक्यातील रिसोड तालुक्याच्या हद्दीतील शेवटच्या टोकाचे खडकी ढंगारे गाव आहे, पूलाची उंची कमी असल्याने बबन यादव ताजने शिरसाळा गावाकडून खडकी येथे पत्नी मुलांसह मोटरसायकल वरुन गावी जात असतांनाच अडोळ नदीला जास्त पाणी आल्याने मोटरसायकल नदीपात्रात वाहून गेली.गाडी क्रमांक एम.एच.३७ ए.सी.६७९४ ची मोटरसायकलची पर्वा न करता गाडी सोडून दिल्याने स्वतः, पत्नी,लहान मुलं वाचले अन्यथा अनर्थ घडला असता.पूलाच्या उंची वाढवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

 

 

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत हे दिवस दरवर्षी पण येतात परंतु बोराळा ते रिठद ही आढळनदीवरील पूलावरुन ये-जा करण्याच्या रस्त्यामध्ये असल्याने गावातून बाहेरगावी गेले असता असे अचानक नदीला पाणी आले त्यामुळे हा प्रकार घडला.पूर आला की रात्र-रात्र गावात जाता येत नाही . त्यामुळे नदीजवळच असलेल्या पुलाचे काठावर पूराचे पाणी उतरण्याची वाट पाहावी लागते.दि.६सष्टे.२०२४ हि घटना घडली. खडकी ढंगारे गावाजवळ असलेल्या पुलाच्या कमी उंचीचा गावकऱ्यांना नेहमीच त्रास होतो.

 

 

करिता या पूलाची उंची वाढवावी किंवा नवीन पूल करण्यात यावा त्यामुळे या समस्येतून कायमची सुटका होईल असे सदाशिव ढंगारे यांनी बोलतांना सांगितले तरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घ्यावी असे सदाशीव ढंगारे यांनी बोलतांना सांगितले.