
यंदाचा दसरा मेळावा गाजणार ! ‘मी येतोय तुम्हीही या’ म्हणत तब्बल १० वर्षानंतर दसरा मेळाव्यात एकत्र बहीण-भाऊ एकत्र…भगवान भक्तीगडावर भाजप नेत्या आ. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा घेतला जातो. मागील १० वर्षांपासून ही परंपरा अखंडित सुरू आहे. परंतु यावेळी पहिल्यांदाच भाऊ तथा पालकमंत्री धनंजय मुंडेदेखील dhananjay munde या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी द्विट करून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. मंत्री मुंडे यांनी ही माहिती दिली आहे.पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट sawaraon ghat हे राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मगाव आहे.
याठिकाणी १० वर्षांपासून ‘पंकजा मुंडे’ यांचा दसरा मेळावा होतो. अमित शाहांसारखे केंद्रातील, राज्यातील अनेक नेतेही या मेळाव्याला आले होते. परंतु धनंजय मुंडे हे विरोधी पक्षात असल्याने कधीच हजर राहात नव्हते. मागील वर्षी राजकीय घडामोडी झाल्यानंतर अजित पवार गट महायुतीत सामील झाला. त्यामुळे पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे एकत्र आले. तरीही २०२३ मध्ये तेमेळाव्याला हजर नव्हते आता २०२४ च्या मेळाव्याला ते हजर राहणार का? त्यानंतर लगेच १० ऑक्टोबर रोजी धनंजय मुंडे यांनी द्विट करत आपण या मेळाव्यासाठी पहिल्यांदाच हजर राहात असल्याची माहिती दिली.
धनंजय मुंडे म्हणाले, ‘चलो भगवान भक्तीगड..!’
‘आपला दसरा, आपली परंपरा..! ही परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचे सोने लुटायला यावर्षी प्रथमच मीही येतोय, भगवान भक्तीगडावर सावरगाव घाट येथे. या विजयादशमीला संत भगवानबाबांचे आशीर्वाद घ्यायला मी येतोय, तुम्हीही या…! असे द्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.