वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरू पाटील
वाशिम (washim) जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रिठद या गावात शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने आपला कर्तव्यावर जाण्यासाठी आडोळ नदीला पार करावे लागते. दरवर्षी हे प्रकार पावसाळ्यात घडतात वारंवार पूर येतात. परंतु हे प्रश्न कायम असतात. हा प्रश्न कायम सुटला असता परंतु वाशिम – रिसोड (risod) राज्यमार्ग क्रमांक ५१ ला जोडून रिठद ते ढोरखेडा जाणारा रस्ता हा मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये खडीकरणाचे व डांबरीकरणाचे काम करण्यात आले.
त्यामध्येच जर या पूलांची उंची वाढवण्यासंदर्भात किंवा नव्याने पूल करण्यासंदर्भात जर संबंधित अभियंत्याने व विभागाने विचार केला असता तर हि वेळ आली नसती. याचा मात्र त्रास दरवर्षीच वाढत चालला असून कर्मचाऱ्यांना सर्वात जास्त त्रास होत आहे. भविष्यात अशीच राहिले तर सर्वच नागरिकांना याचा त्रास होणार आहे यामध्ये शाळेचे विद्यार्थी असो किंवा कामावर जाणारा मजूर वर्ग असो या बाबीचा गांभीर्याने संबंधित विभागाने विचार करणे गरजेचे असून हा नव्याने होणे गरजेचे आहे. अशी मागणी गावातील कर्मचारी तथा शालेय विद्यार्थ्यांनी नदीवरील पुलावर उपस्थित असतांना भावना व्यक्त केल्या.