वाशिम तालुक्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान.

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधि/(नारायणराव आरु पाटील)

 

वाशीम, रिसोड, मालेगाव तालुक्यात २१,२२सष्टे. च्या रात्री विजेचे कडकडणे आणि सतत मुसळधार पाऊस रात्रभर धो-धो बरसला. परिसरातील वाशिम तालुक्यातील अडोळी, खंडाळा, वांगी, धानोरा एकबुर्जी मोहजारोड आणी मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे,अमाणी,करंजी,शेलगाव (ओंकारगीर),मसला (खडकी)तर रिसोड तालुक्यातील रिठद, आसेगावपेन,हिवरा पेन बेलखेडा,पार्डीतिखे, कोयाळी,वरुडतोफा,येवती अशा तिन्ही तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या कापणी केलेल्या सोयाबीन पिकांचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले. संबंधित नुकसानीचा सरसगट पंचनामा करून योग्य मोबदला देण्याची मागणी शेतकरी करत आहेत करण्यात आली आहे.