Washim : मोटर अपघातात मृतक चंद्रकांत मोरे यांच्या परिवाराला लाखाची मदत.

 

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील 

 

वाशिम (Washim) जिल्ह्यातील चाकोली ता.रिसोड येथे मा.श्री.अमित सुभाषराव झनक,आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी वाशिम यांच्या प्रयत्नातून मृतक चंद्रकांत मोरे (chandrakant more) रा.चाकोली यांचा मोटार अपघात मध्ये मृत्यू झाला होता , घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या वारसानां १ लाख रुपयाचे अर्थसाहाय म्हणून त्यांना कुटुंब चालवण्यासाठी शक्य ती मदत शासनाच्या माध्यमातून प्रतिनिधी म्हणून करण्याचा प्रयत्न केला.असे धनादेश देतेवेळी आमदार अमित झनक बोलत होते.

 

 

श्रीमती शोभाबाई मोरे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.यावेळी अमोलभाऊ नरवाडे,सुभाष गरकळ सर,रामेश्वर देवकर,सचिन इप्पर,सतिष मगर, जनार्धन मोरे मंडळ अधिकारी, दिलीप गरकळ,अमोल मगर,गजानन खडसे, रमेश चोपडे,गोपाल मोरे,श्रीमती कविता रामचंद्र मोरे,श्रीमती शोभाबाई मोरे,श्रीमती संगीता पारवे तसेच गावातील मंडळी उपस्थित होती…