
वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरू पाटील
वाशिम जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेचे कर्मचारी वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या अरेरवीपणामुळे व हेकेखोरपणामुळे त्रस्त झाले. यासाठी वाशिम जिल्ह्यातील सर्व कर्मचारी १ सप्टेंबर २०२४ पासून महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ वाशिम व संलग्नित ३४ अधिकारी कर्मचारी संघटना यांनी एकत्र येऊन सामूहिक रजा आंदोलनाचा पवित्र घेतलेला आहे. सदर आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून जिल्हा परिषदेमध्ये नियमित कार्यरत असलेले ३७७० कर्मचारी १००% टक्के या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत.
कर्मचारी वर्गाची ही मागणी रास्त असून या मागणीला लोकप्रतिनिधीचा वाढता पाठिंबा लक्षात घेता आंदोलन स्थळी वाशिम विधानसभेचे आमदार लखन मलिक , वाशिम -मंगरूळपीर विधानसभा वंचित बहुजन आघाडीचे आत्ताचे अधिकृत उमेदवार मेघाताई डोंगरे, वाशिम जिल्ह्यातील सरपंच संघटना, भाजपाचे कार्यकर्ते इत्यादी लोकप्रतिनिधींनी या सामूहिक रजेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून जोपर्यंत वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वैभव वाघमारे यांची बदली करण्यात येत नाही तो पर्यंत असाच पवीत्रा कायम असेल
अशा हेकेखोर कारभारामुळे आणि निलंबित करण्याच्या धमक्यामुळे त्रस्त झालेले जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी तणाव मध्ये आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कार्यपद्धती अनाकलीय असून विविध योजनांच्या प्रशासकीय नस्त्याचे वाचन करून त्यांचे मान्यता किंवा अभिप्राय देणे आवश्यक असतांना तशा प्रकारची कार्यपद्धती न अवलंबता अथवा अमान्य असल्यास लेखी आक्षेप व न नोंदवता अभ्यंगत विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या त्या नस्तीशी काहीही संबंध नसतांना दालनात गर्दी जमून प्रत्येक नस्तीवर अवास्तव चर्चा केली जाते.
त्यामुळे प्रकरणे निकाली न निघता प्रलंबित राहतात तसेच ग्रामीण भागात कार्यरत कर्मचारी यांची काही नागरिक आकस बुद्धीने चुकीच्या तक्रारी करतात त्या तक्रारीची कोणतीही शहानिशा न करता चौकशी न करता थेट कार्यवाही करण्याची पद्धत अवलंबलेली आहे. असेच अधिकारी- कर्मचारी यांना सभेमध्ये सर्वा समक्ष एकेरी व मोठ्या आवाजात दमदाटी करून अपमानित केले जाते.माफी मागावी लागते.कोणतीही चूक नसतांना त्यामुळे अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे धास्तावून गेलेला आहे व मानसिक तणावा मध्ये काम करत आहे त्यामुळेच वाशिम जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी व अधिकारी वर्ग यांनी सामूहिक रजेवर जाऊन आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.