
नारायण आरु/वाशीम जिल्हा प्रतिनिधी
रिसोड (risod) तालुक्यातील वाकद (wakad) या गावी गणेश विसर्जन मिरवणुक सुरु असताना गावातील मुस्लिम समाज बांधवानी गणेश मंडळाच्या अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला व गणेश विसर्जन मिरवणुकीचे स्वागत केले.बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत गणेश मंडळाना शुभेच्छा दिल्या. सध्या दोन समाजात द्वेष पसरविणाऱ्या अनेक घटना घडत असताना वाकद येथील मुस्लिम बांधवानी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे.
देशातील सण उत्सव हे माणुसकी जोपासण्याचे व दोन समाजात सामंजस्य व सदभाव निर्माण करण्यासाठी असतात. ईश्वर म्हणा किंवा अल्लाह यांची सर्व मनुष्याचे कल्याण करण्यासाठी भक्ती व उपासना केली जाते. वाकद येथील मुस्लिम बांधव हिंदूंच्या सर्व सण उत्सवामध्ये नेहमीच सहभागी होतात. तर हिंदू बांधव सुद्धा तेवढ्याच निष्ठेने, आदराने मुस्लिमाच्या सणात सहभागी होतात. ही वाकद गावाची परंपरा नवीन पिढीने सुद्धा कायम ठेवली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे रिसोड तालुका अध्यक्ष सय्यद अकील यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक सलोखा व सामाजिक सदभाव वाढविणारे उपक्रम राबविले जातात.गणेश भक्ताच्या सत्कारासाठी सय्यद अकील सह,उपसरपंच बिलाल कुरेशी,शेख परवेज, सय्यद बबलू, सय्यद अस्लम, शेख शारुख, लुखमन सर, सरफराज सर, शेख अयुब दुकानदार, सय्यद आजम इत्यादी सह बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.