
वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील
washim : जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा कंकरवाडी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित सर्व शिक्षक वृंद व गावकरी मंडळी, शाळा समिती अध्यक्ष सन्माननीय संतोष भाऊ ठाकरे, शाळा समिती उपाध्यक्ष गौतम भाऊ कांबळे, प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल घुगे, गावातील प्रतिष्ठित नागरिक विश्वनाथ मामा काकडे, कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वरी महादा घुगे हिने केले तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी भाषणे करून दोन्ही महापुरुषाबद्दल उत्कृष्टपणे माहिती दिली खरंच शिक्षक बांधवांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्टेज डेरिंग आणि भाषण करण्याचे कौशल्य वाढवल्याबद्दल शाळेतील शिक्षकाचे कौतुक केले.आणि गावकरी मंडळीची व उपस्थित सर्वांची मने जिंकली