हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

केंद्रीय मंत्र्यांच्या मूळ गावाला जाणारी एसटीच मोडकळीस; तारांनी बांधलेली, पत्र्याच्या ठिगळाची बस… म्हणावी की धोक्याची सफर ?

On: September 26, 2026 7:59 AM
Follow Us:
केंद्रीय मंत्र्यांच्या गावाला जाणारी मोडकळीस एसटी बस, तारांनी बांधलेला पत्रा

मेहकर | माधव भांदुर्गे 

डोणगाव पॉईंटवरून दररोज सकाळी सुटणारी एसटी बस बघितली, तर कुणाच्याही काळजाचा ठोका चुकावा अशी तिची अवस्था आहे. समोरचा भाग पूर्णपणे अपघातग्रस्त, तारांनी बांधलेले सुटे भाग आणि त्यावर ठोकलेला पत्र्याचा तुकडा हे दृश्य बघून “ही बस रस्त्यावर धावतेय की कशीबशी ढकलली जातेय” असा प्रश्न कुणालाही पडेल. आणि सगळ्यात काळजी करण्यासारखी गोष्ट म्हणजे, याच बसमधून रोज शाळेत जाणारी शेकडो लहान मुलं प्रवास करतात.

ही सकाळची पहिली फेरी मुद्दाम शालेय विद्यार्थ्यांसाठी सोडली जाते. गावोगावचे विद्यार्थी याच बसने डोणगावला शाळेसाठी पोहोचतात. पण रस्त्यात ही बस कधी बंद पडेल, इंजिनमध्ये बिघाड होईल की तुटलेला भाग अचानक निखळेल, याचा काहीच भरवसा नाही. त्यामुळे मुलांना बसमध्ये बसवून शाळेत पाठवणाऱ्या प्रत्येक पालकाच्या मनात एक अनामिक भीती कायम असते. सकाळी मूल घरातून निघालं की संध्याकाळी सुखरूप परत येईल का, हा विचार आता डोणगाव परिसरातल्या पालकांच्या मनात कायमचा घर करून बसला आहे.या प्रकरणातली सगळ्यात मोठी विसंगत गोष्ट म्हणजे, ही अपघातग्रस्त बस ज्या मार्गावर धावते तो मार्ग थेट केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या ‘मादणी’ या मूळ गावाला जोडतो. बस सकाळी सहा वाजता मादणीला पोहोचते आणि तिथून विद्यार्थ्यांना घेऊन डोणगावकडे परत येते. एका केंद्रीय मंत्र्यांच्या गावाकडे जाणारी बस जर अशी मोडकळीस आलेली असेल, तर इतर दुर्गम गावांमधल्या बसेसची अवस्था काय असेल, याचा अंदाज सहज बांधता येतो. गावात येणारे पाहुणे, नातेवाईक ही बस बघून काय बोलत असतील, हा प्रश्नही आता गावकरी उघडपणे विचारू लागले आहेत.

विशेष म्हणजे शासनाने अलीकडेच मेहकर आगाराला नव्या बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे किमान या मार्गावर तरी परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा पालकांना आणि ग्रामस्थांना होती. पण प्रत्यक्षात घडलं उलटंच. नव्या बसेस येऊनही डोणगाव-मादणी मार्गावर याच जुन्या, अपघातग्रस्त बसची ड्युटी कायम ठेवण्यात आली आहे. “दुष्काळात तेरावा महिना” या म्हणीचा प्रत्यय गावकऱ्यांना रोज याच बसमधून येतो आहे.

बसची अवस्था नेमकी कशी आहे, हे बघितलं तर काळजी आणखी वाढते. समोरचा भाग अपघातात खराब झालेला असून तो पूर्णपणे उघडा पडू नये, म्हणून त्यावर पत्र्याचा एक तुकडा बसवण्यात आला आहे. हा पत्रा साध्या वेल्डिंगने किंवा स्क्रूने नाही, तर चक्क तारांनी बांधलेला आहे. या पत्र्याखाली लपलेले काही महत्त्वाचे सुटे भागही त्याच पद्धतीने तारांनी अडकवून ठेवलेले स्पष्ट दिसतात. रोज खड्डेयुक्त ग्रामीण रस्त्यांवरून धावणाऱ्या बसमध्ये असे तात्पुरते, जुगाड पद्धतीने केलेले दुरुस्तीकाम किती दिवस टिकेल, आणि प्रवासादरम्यान अचानक काही निखळलं तर काय होईल, याचा विचार करूनच अंगावर काटा येतो.

राज्यभरात ग्रामीण भागातल्या एसटी बसेसची अशी दुरवस्था नवीन नाही. अनेक मार्गांवर जुन्या, भंगार झालेल्या बसेस अजूनही सेवेत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर येतात. पण जिथे प्रशासनाला स्वतःहून लक्ष द्यायला हवं, अशा मंत्र्यांच्या गावाकडे जाणाऱ्या मार्गावरच जर अशी हलगर्जी दिसत असेल, तर बाकीच्या दुर्गम गावांची काय स्थिती असेल, हे वेगळं सांगायची गरज नाही.

मेहकर आगाराच्या या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांचा आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोणगाव आणि परिसरातील पालक व ग्रामस्थांनी आता याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. या अपघातग्रस्त बसची तातडीने संपूर्ण दुरुस्ती करावी, किंवा ती पूर्णपणे बंद करून त्या जागी सुस्थितीतील नवी बस त्वरित सुरू करावी, अशी ठाम मागणी केली जात आहे. मुलांच्या जीवाशी खेळ थांबवावा, एवढीच माफक अपेक्षा आता गावकऱ्यांची आहे.

प्रशासनाने वेळीच लक्ष दिलं नाही, तर उद्या एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर जाग येण्यापेक्षा, आजच योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे. तुमच्या परिसरातही अशी एखादी बस किंवा रस्ता धोकादायक वाटत असेल, तर ती माहिती आम्हाला जरूर कळवा गरज पडल्यास kattanews.in तुमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवेल.

संबंधित बातम्या


 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेडराजा शेतकरी नुकसान भरपाई निवेदन देताना डॉ. शशिकांत खेडेकर आणि पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

वीज नाही म्हणून पीक जळालं तरी मदत मिळणार? सिंदखेडराजा शेतकरी नुकसान भरपाईचा मोठा निर्णय होणार का?

बुलढाणा सिंदखेडराजा बारलिंगा शिवारातील तणनाशकाने उद्ध्वस्त झालेले कापूस पीक

कुणाचा एवढा आकस? बारलिंग्यात रातोरात तणनाशक फवारून शेतकऱ्याचा ३ एकर कापूस उद्ध्वस्त; तहसीलदारांकडे न्यायाची मागणी

बुलढाणा जिल्ह्यात FFS प्रणाली अंतर्गत खत खरेदी करताना शेतकरी

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बुलढाणा जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून खत विक्रीची नवी FFS प्रणाली; DAP २ तर युरिया ५ बॅगची कमाल मर्यादा

डोणगाव FDA कारवाई चिंतामणी दूध डेअरी नमुने जप्त

मेहकर तालुक्यातील डोणगावात FDA ची अचानक धाड; चिंतामणी दूध डेअरीतून दूध आणि खव्याचे नमुने ताब्यात

साखरखेर्डा अपर तहसीलदार कार्यालय शासन निर्णय GR

साखरखेर्डा अपर तहसीलदार कार्यालय अखेर सुरू होणार, महाराष्ट्र शासनाचा निर्णय, नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण

सिंदखेडराजात बुलढाणा जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन

बुलढाणा जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा! सिंदखेडराजात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रस्ता रोको आंदोलन

Leave a comment