हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

सायंकाळी बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; चिखली–दरेगाव मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी

On: August 21, 2026 6:17 AM
Follow Us:
चिखली दरेगाव मार्गावर मुक्कामी एसटी बस सुरू करण्याची मागणी

चिखली | सुनिल अंभोरे, प्रतिनिधी

सायंकाळच्या वेळेत बस उपलब्ध होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता चिखली–मेरा खुर्द–मेरा बुद्रुक–दरेगाव मार्गावर रात्रीची मुक्कामी एसटी बस सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमोल मोरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी बुलढाणा विभागीय कार्यालयात निवेदन सादर केले आहे.

चिखली हे तालुक्याचे ठिकाण असल्याने मेरा खुर्द, मेरा बुद्रुक, अंत्री खेडेकर, गुंजाळा, मनुबाई आणि दरेगाव परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षण, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस तसेच इतर कामांसाठी दररोज चिखली येथे ये-जा करतात. याशिवाय कामगार, व्यावसायिक आणि शेतकरी वर्गाचीही चिखली येथे नियमित ये-जा असते.

मात्र सायंकाळच्या वेळेत पुरेशी आणि वेळेवर बस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना गावाकडे परतताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा खासगी वाहनांचा महागडा प्रवास करावा लागत असून, त्यामुळे पालकांचीही चिंता वाढली आहे.

चिखली आगारातून सायंकाळी सुटणारी आणि दरेगाव येथे मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी सकाळी चिखलीकडे परतणारी बस सुरू झाल्यास या मार्गावरील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची मोठी सोय होईल. सकाळी चिखली येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या बससेवेचा फायदा मिळू शकतो.

मेरा खुर्द, मेरा बुद्रुक आणि दरेगाव मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी असतानाही पुरेशी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे चिखली–मेरा खुर्द–मेरा बुद्रुक–दरेगाव मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ही बससेवा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुलभ होण्यासोबतच ग्रामस्थांना सुरक्षित आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होईल. तसेच या मार्गावर नियमित प्रवासी मिळाल्याने एसटी महामंडळालाही महसूल मिळण्याची शक्यता असल्याचे अमोल मोरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

मेरा खुर्द, अंत्री खेडेकर आणि मेरा बुद्रुक मार्गावर सायंकाळच्या वेळेत बस नसल्यामुळे शाळा व महाविद्यालयातून उशिरा सुटणाऱ्या विद्यार्थ्यांना गावात पोहोचण्यासाठी अडचणी येत आहेत. खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. मुक्कामी बस सुरू झाल्यास सकाळी गावातून चिखलीकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही वेळेत पोहोचणे शक्य होईल.

— कैलास आंधळे, मेरा बुद्रुक

प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा

“रात्रीची मुक्कामी बस दरेगाव येथे थांबल्यास सकाळी ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना वेळेत शहरात जाता येईल. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गरज ओळखून ही बस लवकरात लवकर सुरू करावी.”

— अमोल मोरे, क्रांतिकारी शेतकरी संघटना

📲 चिखली आणि बुलढाणा जिल्ह्यातील kattanews.in ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा!

👉Join WhatsApp Group

सुनिल अंभोरे

सुनिल अंभोरे हे आपल्या न्यूज नेटवर्कचे विश्वासार्ह आणि सक्रिय वार्ताहर असून ग्रामीण, सामाजिक, प्रशासकीय तसेच जनहिताच्या विषयांवर सातत्याने लेखन करतात. स्थानिक पातळीवरील घडामोडी अचूक, निष्पक्ष आणि तथ्यांच्या आधारे वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देणारी पत्रकारिता करण्यावर त्यांचा भर आहे. बातमी लेखनात पारदर्शकता, विश्वसनीय स्रोत आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

चिखली नगर परिषदेच्या भटक्या कुत्रे नसबंदी योजनेवर मनसेची चौकशीची मागणी

2,495 फोटो कुठे? चिखली नगर परिषदेच्या भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; मनसेकडून चौकशीची मागणी

साखरखेर्ड्यात विद्यार्थ्यांसाठी सोशल मीडिया व व्यसनमुक्ती जनजागृती अभियान

साखरखेर्ड्यात विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती अभियान; सोशल मीडिया, व्यसन आणि ऑनलाइन फसवणुकीबाबत पोलिसांचे मार्गदर्शन

देऊळगाव राजात दोन गटांत हाणामारी, नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

कव्वाली संपली अन् वाद पेटला! देऊळगाव राजात दोन गटांत तुफान हाणामारी; शिवसेना नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

चिखली भाजप नगरसेवकाची रस्त्याच्या निधीसाठी बॅनरबाजी

‘मी सिमेंट रोड बोलतोय…’; चिखलीत भाजप नगरसेवकाची अनोखी बॅनरबाजी, रस्त्याच्या निधीच्या मागणीने राजकीय चर्चांना उधाण

बुलडाण्यातील भाजप-शिवसेना संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड

“मुख्यमंत्र्यांच्या नावाने वसुली होतेय?”; “आरोप खोटा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन” बुलडाण्यातील भाजप-शिवसेना संघर्षात संजय गायकवाडांचा मोठा दावा

श्री व्यंकटेश महाविद्यालयात गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान

श्री व्यंकटेश महाविद्यालयात गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान; सत्य, अहिंसा आणि मूल्यनिष्ठेचा जागर

Leave a comment