हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बेलगावात दारूविक्रीचा डाव फसला ! ३०० बाटल्यांसह ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त

On: August 19, 2026 8:05 AM
Follow Us:
बेलगावात डोणगाव पोलिसांनी जप्त केलेल्या 300 देशी दारूच्या बाटल्या
मेहकर |दिपक देशमुख 

बेलगाव येथे विनापरवाना देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर डोणगाव पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत देशी दारूच्या ३०० सीलबंद बाटल्या आणि दुचाकी असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ग्राम बेलगाव, ता. मेहकर येथे ही कारवाई करण्यात आली. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या कारवाईत आरोपी अतिक्रम परशुराम किशोर (वय ३८, रा. अपनपल्ली, मेदक, तेलंगणा; ह.मु. बेलगाव, ता. मेहकर, जि. बुलढाणा) याच्या ताब्यात देशी दारूच्या ३०० सीलबंद बाटल्या आढळून आल्या.

पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या बाटल्या बॉबी संत्रा कंपनीच्या ९० एमएल क्षमतेच्या आहेत. या दारूची अंदाजे किंमत १२ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दारूसोबत होंडा शाइन कंपनीची काळ्या-लाल पट्ट्यांची दुचाकी (क्रमांक MH-28-BD-1594) देखील पोलिसांनी जप्त केली. या दुचाकीची अंदाजे किंमत ४० हजार रुपये असून, दारू आणि दुचाकी मिळून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विनापरवाना दारू जवळ बाळगून तिची विक्री करत असल्याचे आढळून आल्याने आरोपीविरुद्ध डोणगाव पोलीस ठाण्यात प्रोव्ही गुन्हा क्रमांक 270/2026, कलम 65(ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला सूचनापत्रावर सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश कड यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस ठाणेदारांच्या आदेशाने पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर सोनुने (बकल नं. ५०२) करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास गावडे (बकल नं. १०६) यांनी केली.

डोणगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे बेलगाव परिसरातील अवैध दारूविक्रीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पोलिसांकडून अवैध दारूविक्रीविरोधातील कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे.

📲 KattaNews WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हाबुलढाणा जिल्ह्यातील ताज्या स्थानिक बातम्या, पोलीस कारवाई, सरकारी योजना, शेती आणि महत्त्वाच्या अपडेट्स थेट मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

Join WhatsApp Group

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

शेगावमध्ये जप्त करण्यात आलेल्या बनावट ५०० रुपयांच्या नोटा

शेगावमध्ये ५ लाखांच्या बनावट नोटांचा खेळ; ‘इंडियन चिल्ड्रेन बँक’च्या ९९९ नोटा जप्त

ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल झालेल्या शिंदी ग्रामपंचायतीचे कार्यालय, साखरखेर्डा

ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल, शिंदीत सरकारी जागा वैयक्तिक नावावर केल्याचा आरोप, न्यायालयाच्या आदेशानंतर साखरखेर्डा पोलिसांची कारवाई

डोणगाव दुष्काळामुळे लोणी गवळी परिसरात करपलेले पीक

डोणगाव-लोणी गवळीतील पिके करपली, शेतकरी संकटात; पालकमंत्र्यांनी बांधावर येऊन पाहणी करावी, प्रशांत पाटील यांची मागणी

देऊळगाव राजा पत्रकार संघटनांचे पदाधिकारी तहसीलदारांना निवेदन देताना

देऊळगाव राजा पत्रकार संघटना आक्रमक: समाजमाध्यमांवरील बदनामीकारक मजकुराविरोधात तहसीलदारांना निवेदन, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार अवैध धंदे बंद करण्याची मागणी करताना डॉ. गोपाल बच्छीरे व शिवसैनिक

लोणारमध्ये गुटखा, वरली-मटका आणि अवैध दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर; १५ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

मालेगाव ते मेहकर महामार्गावरील खड्डेमय रस्ता

मालेगाव ते मेहकर महामार्गाचे दुपदरी सिमेंट कॉंक्रीटीकरण करा; माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांची गडकरींकडे मागणी

Leave a comment