हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखलीत घरफोडी करणारा ‘मोक्का’तील कुख्यात चोर अखेर नेवाशातून गजाआड; चोरीचा संपूर्ण ऐवज हस्तगत

On: August 18, 2026 7:26 AM
Follow Us:
चिखली घरफोडी प्रकरणातील मोक्का आरोपी नेवाशातून अटक
चिखली | विशाल गवई 

चिखली शहरातील श्रीकृष्णनगर परिसरात वृद्धाचे घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या कुख्यात अट्टल चोराच्या मुसक्या अखेर पोलिसांनी आवळल्या आहेत. ‘मोक्का’अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीला चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याने या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लागला आहे.

श्रीकृष्णनगर येथील रहिवासी रघुनाथ जगन्नाथ कंगले (वय ६९) हे २९ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मुलाकडे गेले होते. २ ऑगस्ट रोजी ते घरी परतले असता घराच्या गेटचे आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात पाहणी केली असता कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, मणी, २५ चांदीची नाणी, चांदीचा शिक्का आणि रोख १२ हजार रुपये असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या घटनेनंतर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाला वेग देत परिसरातील माहिती आणि उपलब्ध सुरागांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला.

📲 चिखली-बुलढाण्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा!गुन्हे, स्थानिक घडामोडी, प्रशासन, शेती, शिक्षण आणि महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी Katta News च्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

👉 WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे घरफोडीतील संशयित आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे असल्याचे समोर आले.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सलाबतपूर येथे कारवाई करत डीचेन त्र्यंबक भोसले (वय ४८, रा. सलाबतपूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या माहितीनुसार, भोसले हा कुख्यात अट्टल चोर असून त्याच्यावर यापूर्वी विविध जिल्ह्यांत घरफोडी आणि दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात त्याच्यावर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई झालेली आहे.

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने चिखलीतील घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.

या कारवाईमुळे श्रीकृष्णनगर परिसरातील घरफोडीच्या या गुन्ह्याचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. आरोपीच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.

🔔 KattaNews सोबत अपडेट राहाचिखली आणि बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या स्थानिक बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी Katta News ला नियमित भेट द्या. ही बातमी आपल्या मित्र-नातेवाईकांसोबत शेअर करा.

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

nqas-pressure-cho-sandeep-hade-mehkar

मांडवा उपकेंद्राच्या CHO ची झेंडावंदनानंतर आत्महत्या; NQAS मूल्यांकनाच्या दबावाचा आरोप

बुलडाण्यात एकाच रात्री 18 शेळ्या चोरीला

पहाटे गोठा उघडला अन् पायाखालची जमीन सरकली! एकाच रात्रीत 18 शेळ्या गायब

आव्हा गावात वाढलेल्या चोरीच्या घटनांनंतर पोलिस संरक्षणाची मागणी

आव्हा गावात चोरट्यांचा धुमाकूळ! १५ दिवसांत ४-५ चोऱ्या; पोलिस संरक्षणाची मागणी

चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने शहीद जवानांच्या स्मारकावर अभिवादन

शहीदांच्या बलिदानाला पत्रकार संघाचा मानाचा मुजरा!स्वातंत्र्यदिनी चिखली तालुका पत्रकार संघाने शहिदांच्या स्मृतींना केले अभिवादन

गवंढाळा ग्रामपंचायत अधिकारी निलंबित

“जनतेच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल!”; गवंढाळा ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर अखेर निलंबनाची कारवाई

चिखलीतील श्रीराम पतसंस्था ते बैल जोडी चौक रस्त्याची दुरवस्था आणि मनसे आंदोलनाचा इशारा

चिखलीत श्रीराम पतसंस्था ते बैल जोडी चौक रस्त्याचा प्रश्न पेटला; ३-४ दिवसांत काम सुरू करा, मनसेचा आंदोलनाचा इशारा

Leave a Comment