हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

राहुलभाऊ गप्प… चिखलीच्या राजकारणात मात्र मोठ्या हालचाली; भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा ऐरणीवर

On: August 11, 2026 11:30 AM
Follow Us:
राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने चिखलीच्या राजकारणात हालचाली

चिखली : विशाल गवई 

बुलढाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखली विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी आमदार तथा माजी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे, या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राहुल बोंद्रे यांनी मौन बाळगल्याने राजकीय वर्तुळातील उत्सुकता आणखी वाढली आहे.

राहुल बोंद्रे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा चिखली मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत आली आहे. यापूर्वी अनेकदा या चर्चांना उधाण आल्यानंतर स्वतः बोंद्रे यांनी भाजप प्रवेशाच्या शक्यता फेटाळून लावत आपण काँग्रेसमध्येच असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे ‘राहुलभाऊ भाजपमध्ये जाणार’ ही चर्चा अनेकदा केवळ राजकीय चर्चेपुरतीच मर्यादित राहिली.

मात्र, गेल्या दोन दिवसांतील काही राजकीय हालचालींमुळे यावेळी या चर्चेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्ष पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आणि नगरसेवकांच्या बैठका झाल्याची माहिती समोर आली असून, त्यानंतर राहुल बोंद्रे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांना पुन्हा बळ मिळाले आहे.

विशेष म्हणजे, ९ ऑगस्टनंतर या चर्चांना अधिकृत राजकीय हालचालींची किनार मिळाल्याचे बोलले जात असून, १३ ऑगस्ट रोजी प्रवेश होणार असल्याची चर्चा सध्या चिखलीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या संभाव्य प्रवेशाबाबत राहुल बोंद्रे किंवा भाजपकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

दरम्यान, राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसमधील काही नेत्यांना आपल्या निर्णयाची माहिती दिल्याचे आणि सध्याच्या परिस्थितीत पर्याय राहिला नसल्याचे सांगितल्याची चर्चा आहे. या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नसल्याने त्याबाबत निश्चित निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.

दुसरीकडे, चिखलीतील श्रीराम नागरी पतसंस्थेच्या सभागृहात भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत पक्ष पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाल्याची माहिती आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

याच काळात माजी आमदार राहुल बोंद्रे यांनीही नगरपालिकेतील नगरसेवकांची बैठक घेतल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आणि दुसरीकडे बोंद्रे यांची नगरसेवकांसोबतची बैठक यामुळे त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे.

या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे राहुल बोंद्रे यांचे मौन. यापूर्वी अशा चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी स्वतः भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, यावेळी ते कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया देत नसल्याने त्यांच्या भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

जर राहुल बोंद्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर चिखली विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेससाठी हा राजकीय धक्का ठरेल का, भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर कोणती नवी समीकरणे तयार होतील आणि आगामी राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

१३ ऑगस्टच्या चर्चित तारखेला नेमके काय घडते आणि राहुल बोंद्रे आपली भूमिका स्पष्ट करतात का, याकडे चिखलीसह बुलढाणा जिल्ह्याचे राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे.

📲 चिखली आणि बुलढाण्यातील ताज्या राजकीय घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.

👉 WhatsApp Group Join करा

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाणा सिंदखेडराजा बारलिंगा शिवारातील तणनाशकाने उद्ध्वस्त झालेले कापूस पीक

कुणाचा एवढा आकस? बारलिंग्यात रातोरात तणनाशक फवारून शेतकऱ्याचा ३ एकर कापूस उद्ध्वस्त; तहसीलदारांकडे न्यायाची मागणी

बुलढाणा जिल्ह्यात FFS प्रणाली अंतर्गत खत खरेदी करताना शेतकरी

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बुलढाणा जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून खत विक्रीची नवी FFS प्रणाली; DAP २ तर युरिया ५ बॅगची कमाल मर्यादा

डोणगाव FDA कारवाई चिंतामणी दूध डेअरी नमुने जप्त

मेहकर तालुक्यातील डोणगावात FDA ची अचानक धाड; चिंतामणी दूध डेअरीतून दूध आणि खव्याचे नमुने ताब्यात

साखरखेर्डा अपर तहसीलदार कार्यालय शासन निर्णय GR

साखरखेर्डा अपर तहसीलदार कार्यालय अखेर सुरू होणार, महाराष्ट्र शासनाचा निर्णय, नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण

सिंदखेडराजात बुलढाणा जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन

बुलढाणा जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा! सिंदखेडराजात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रस्ता रोको आंदोलन

बुलढाणा राजूर घाटात सापडलेला अनोळखी मृतदेह, पोलीस तपास

बुलढाणा: राजूर घाटात नेमकं काय घडलं? हनुमान मंदिराजवळ दरीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

Leave a comment