हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मोठी बातमी! बुलढाणा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत डॉ. राजेंद्र शिंगणे पहिल्याच दिवशी अविरोध विजयी

On: July 29, 2026 9:55 AM
Follow Us:
बुलढाणा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांची पहिल्याच दिवशी अविरोध निवड

बुलढाणा |समाधान सरकटे 

बुलढाणा जिल्हा सहकारी केंद्रीय बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्याच दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. सिंदखेडराजा प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था मतदारसंघातून माजी मंत्री तथा ज्येष्ठ सहकार नेते डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे यांची अविरोध निवड झाली आहे. अर्ज माघारीच्या प्रक्रियेदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार दत्ताराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली.

या मतदारसंघातून सुरुवातीला डॉ. राजेंद्र शिंगणे आणि दत्ताराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर दोन्ही अर्ज वैध ठरल्याने या ठिकाणी चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी दत्ताराव देशमुख यांनी माघार घेतल्याने बुलढाणा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलले.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

डॉ. राजेंद्र शिंगणे हे बुलढाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. अनेक वर्षे सहकार चळवळीत सक्रिय राहिलेल्या शिंगणे यांच्या अविरोध निवडीमुळे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विविध सहकारी संस्था, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून जिल्हा बँकेच्या आगामी संचालक मंडळात त्यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष लागले आहे.

जिल्हा सहकारी बँक निवडणुकीतील अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर इतर अनेक मतदारसंघांमध्येही राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून तर काही ठिकाणी थेट लढती रंगणार आहेत. त्यामुळे अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचे संपूर्ण चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

सहकार क्षेत्रातील या घडामोडीकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले असून आगामी काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या स्थापनेत कोणते नवे राजकीय समीकरण तयार होते, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

📲 ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी
आमचा WhatsApp Group आजच Join करा!

👉 WhatsApp Group Join करा

Related News

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेडराजा येथील वैष्णव गडावर आषाढी एकादशीला हजारो वारकऱ्यांची पैदल वारी

आषाढी एकादशीला वैष्णव गडावर भक्तीचा महासागर! हजारो वारकऱ्यांची पैदल वारी, ३५ क्विंटल फराळ आणि ५०० सेवाधाऱ्यांची सेवा

धामणगावात अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर धाड पोलिसांची कारवाई

धामणगावात अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर धाड पोलिसांचा धडाका; 5 जणांवर गुन्हे

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथे रोही (नीलगायी)च्या कळपाने शेतकरी राम रतन पवार यांच्या दोन एकरांतील कपाशी पिकाचे केलेले नुकसान

सिंदखेडराजा: रोही (नीलगायी)च्या कळपाने दोन एकरांतील कपाशी उद्ध्वस्त; शेतकरी राम रतन पवार यांचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात ACBने बीबी पोलीस ठाण्याच्या हेडकॉन्स्टेबलला PCR मध्ये वाढ न करण्यासाठी ₹5 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

बुलढाणा: PCR मध्ये वाढ न करण्यासाठी ₹5 हजारांची लाच घेताना बीबी पोलीस ठाण्याचा हेडकॉन्स्टेबल रंगेहात जेरबंद

देऊळगाव राजात भरदिवसा घरफोडी; २.३६ लाखांचा ऐवज लंपास

घर बंद… अन् काही तासांतच लाखोंचा डल्ला! देऊळगाव राजात भरदिवसा धक्कादायक घरफोडी; २.३६ लाखांचा ऐवज लंपास

ज्ञानगंगा अभयारण्यात ताडोबातून आलेली मोना वाघीण आणि धुरंधर वाघ

७ महिन्यांनी ‘धुरंधर’ला मिळाली साथ; ताडोबातील ‘मोना’च्या आगमनाने ज्ञानगंगा अभयारण्यात वाघ संवर्धनाला नवी दिशा

Leave a Comment