हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

महिलांच्या पर्सवर ठेवत होती पाळत; लाखोंचे दागिने चोरणारी महिला अखेर जेरबंद

On: June 6, 2026 9:52 AM
Follow Us:
चिखली पोलिसांनी दागिने चोरी प्रकरणातील महिला आरोपीला छत्रपती संभाजीनगरातून अटक केली

चिखली | विशाल गवई 

महिलांच्या हालचालींवर पाळत ठेवून त्यांच्या पर्स आणि पिशव्यांमधील मौल्यवान दागिने चोरणाऱ्या एका महिलेला चिखली पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने छत्रपती संभाजीनगरातून अटक केली आहे. पोलिसांच्या तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि सातत्यपूर्ण शोधमोहीमेमुळे या चोरीचा उलगडा झाला असून आरोपी महिलेकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे चिखली परिसरात महिलांना लक्ष्य करणाऱ्या चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेली चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. विशेष म्हणजे, आरोपी महिला गर्दीच्या ठिकाणी महिलांवर नजर ठेवून योग्य संधी साधत चोरी करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मे २०२६ रोजी फिर्यादी महिला आपल्या वडिलांसोबत चिखली येथे जुन्या सोन्याचे दागिने मोडून नवीन दागिने तयार करण्यासाठी आल्या होत्या. नवीन तयार झालेले सुमारे ४५.४४ ग्रॅम सोन्याचे दागिने, २१ ग्रॅम वजनाचे चांदीचे जोडवे आणि इतर साहित्य त्यांनी एका कपडी पिशवीत ठेवले होते. त्यानंतर ही पिशवी वायरच्या पिशवीत ठेवून त्या खरेदीसाठी मनीषा स्टील होम येथे गेल्या.

दुपारी दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान गर्दीचा फायदा घेत एका अनोळखी महिलेने दागिन्यांची पिशवी चोरून नेली. चोरीची घटना लक्षात आल्यानंतर फिर्यादी महिलेने तातडीने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार अमोल गवई यांच्याकडे सोपविण्यात आला होता. पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान आरोपी महिला अंबड तालुक्यातील चंदनपुरी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर डीबी पथकाने छत्रपती संभाजीनगर येथे विशेष शोधमोहीम राबवली. घाटी रुग्णालय परिसरात संशयित महिलेला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान तिने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीनंतर तिने चोरीची कबुली दिली.

आरोपी महिलेची ओळख सुवर्णा काकासाहेब काळे (वय ४०) अशी असून ती मूळची शेवगाव, जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी आहे. सध्या ती चंदनपुरी, तालुका अंबड, जिल्हा जालना येथे वास्तव्यास होती. आरोपीकडून चोरीतील सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अमोल गवई, प्रशांत धंदर, अजय इटावे, परशुराम मिसाळ, राहुल पाचपवार, निलेश सावळे आणि महिला पोलीस अंमलदार सुरेखा म्हस्के यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

महिलांनी खरेदीसाठी बाहेर पडताना मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांची विशेष काळजी घ्यावी तसेच गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


वाचकांसाठी महत्त्वाचे

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, गुन्हेगारी बातम्या, सरकारी योजना, शेती, राजकारण आणि ब्रेकिंग न्यूज सर्वप्रथम वाचण्यासाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या.


Related News

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment