हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाणा रोडवर भीषण अपघात; HDFC बँक अधिकाऱ्याचा मृत्यू, एक गंभीर जखमी

On: June 3, 2026 7:51 AM
Follow Us:
बुलढाणा रोडवरील भीषण अपघातात HDFC बँक अधिकाऱ्याचा मृत्यू

चिखली | विशाल गवई 

बुलढाणा रोडवरील दांडगे पेट्रोल पंपाजवळ सोमवारी (१ जून) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात HDFC बँकेत कार्यरत असलेल्या एका तरुण अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चिखली शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघाताची बातमी समजताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुलसुंदर आणि गोलू गवारे हे दोघे मोटारसायकल क्रमांक एमएच-२८ बीएक्स-२७८६ वरून बुलढाण्याकडून चिखलीकडे येत होते. दरम्यान, दांडगे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या मोटारसायकलची वॅगनार कार क्रमांक एमएच-४९ बीबी-६३४६ सोबत जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलचे अनेक भाग तुटून रस्त्यावर विखुरले गेले.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या अपघातात अक्षय कुलसुंदर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गोलू गवारे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील जे जे प्लस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दोघेही चिखली शहरातील राऊतवाडी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमीला उपचारासाठी रवाना केले. अपघाताची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताचे कारण शोधण्यास सुरुवात केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, तरुण वयात झालेल्या या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अक्षय कुलसुंदर यांच्या निधनाची बातमी समजताच मित्रपरिवार, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला. चिखली शहरात या घटनेची दिवसभर चर्चा सुरू होती.

गेल्या काही दिवसांत बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

📢 तुमच्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या

बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, मलकापूर आणि जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी आणि कृषी विषयक बातम्या सर्वप्रथम वाचण्यासाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

संबंधित बातम्या

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाणा एसटी विभागाने ४६ कोटींची विक्रमी उत्पन्नवाढ करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला

बुलढाणा एसटी विभागाची राज्यात नंबर-1 कामगिरी; एका वर्षात तब्बल ४६ कोटींची विक्रमी उत्पन्नवाढ

साखरखेर्डा ग्रामसभेत क्रीडांगणासाठी सरकारी जमीन राखीव ठेवण्याचा एकमुखी ठराव मंजूर

साखरखेर्डा मधील क्रीडांगणावर अखेर शिक्कामोर्तब! ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर; युवकांनी फटाके फोडून केला जल्लोष

₹25 हजारांची लाच घेताना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप मोरे ACB च्या जाळ्यात

₹25 हजारांची लाच घेताना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप मोरे ACB च्या जाळ्यात; विकासकामांच्या बिलासाठी मागितले होते 3% कमिशन

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे पोलीस शिपाई चंद्रनिलकांत सोनुने यांनी मुंबईतील 80 वर्षीय महिलेला मदत केल्यानंतर त्यांचा गौरव करण्यात आला.

मुंबईत 80 वर्षीय आजीला दिला आधार; चिखलीच्या पोलीस शिपाई चंद्रनिलकांत सोनुने यांच्या माणुसकीची सर्वत्र चर्चा

बुलढाण्यात एसटी स्थानकाच्या 200 मीटर परिसरात RTO आणि पोलिसांची वाहन जप्ती कारवाई

एसटी स्थानकाच्या 200 मीटरमध्ये वाहन लावलं? थेट जप्ती; बुलढाण्यात RTO-पोलिसांची धडक कारवाई, 270 वाहनांवर Action

सिंदखेडराजा येथे SIR प्रक्रियेच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे

SIR कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; सिंदखेडराजात जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांचा कडक इशारा

Leave a Comment