हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

पोहण्याचा मोह मुलाच्या जिवावर बेतला; तलावातील गाळात फसल्याने मृत्यू

On: May 20, 2026 7:35 AM
Follow Us:
जयपूर लांडे शिवारातील तलावात पोहताना गाळात अडकलेल्या मुलाची घटना

खामगाव | विशाल गवई 

खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे शिवारात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेळ्या चराईसाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा तलावात पोहताना गाळात अडकल्याने मृत्यू झाला. रविवारी सकाळी घडलेल्या या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

जयपूर लांडे येथील समर्थ मंगलसिंग पवार (वय १३) हा सकाळी शेळ्या घेऊन शिवारात गेला होता. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने तो परिसरातील फादर कॉलनी तलावात पोहण्यासाठी उतरला. सुरुवातीला तो सहज पोहत होता. मात्र काही वेळातच तलावातील खोल भागातील गाळात त्याचा पाय अडकला.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

गाळात फसल्यामुळे त्याला बाहेर येता आले नाही. हा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी धाव घेत त्याला बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी तातडीने खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर जयपूर लांडे परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. अल्पवयीन मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. समर्थच्या निधनामुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याप्रकरणी निशांत प्रतापसिंग पवार यांनी खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १७४ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोहेकॉ मधुकर पवार करीत आहेत.

दरम्यान, उन्हाळ्यात तलाव आणि पाणीसाठ्यांमध्ये पोहताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः लहान मुलांनी एकटे पाण्यात उतरू नये, असेही सांगण्यात आले आहे.


Related News


अशाच ताज्या आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

कर्तव्यावर निघालेल्या बुलढाणा आगारातील एसटी चालक रमेश उबरहंडे यांचा बोलेरोच्या धडकेत मृत्यू

कर्तव्यावर निघालेल्या एसटी बसचालकाचा भीषण अपघातात मृत्यू; भरधाव बोलेरोची जोरदार धडक

लोणार येथे शाहीर कृष्णकांत जोशी बहुउद्देशीय संस्थेतर्फे संत जनाबाई महिला मंडळातील महिला लोककलावंतांचा शाल, प्रशस्तीपत्र आणि वडाच्या रोपांचे वाटप करून सन्मान करण्यात आला.

लोणारमध्ये महिला लोककलावंतांचा गौरव; शाहीर कृष्णकांत जोशी संस्थेकडून शाल, प्रशस्तीपत्र आणि वडाच्या रोपांचे वाटप

मलकापूरमध्ये SBI एटीएममध्ये ग्रामसेविकेचे एटीएम कार्ड बदलून ७० हजार रुपये काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ग्रामसेविकेला एटीएममध्ये ७० हजारांचा गंडा; कार्ड बदलून अज्ञातांनी खाते केले रिकामे, गुन्हा दाखल

दिवठाणा येथील चिखलमय रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी; पालकांनी गावातच शाळा भरवून केलेले अनोखे आंदोलन

रस्ताच नाही, मग गावातच भरली शाळा! दिवठाण्यात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालकांचे अनोखे आंदोलन

देऊळगाव मही येथे ५ कोटी रुपयांची जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना रखडल्याच्या निषेधार्थ पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणारे ग्रामस्थ

५ कोटींची ‘जलजीवन’ योजना ५ वर्षांपासून रखडली; पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थांचे आंदोलन, प्रशासनाला अखेर झुकावे लागले

बुलढाणा येथील डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयात बेकायदेशीर जैव उत्तेजक खतांचा साठा जप्त करताना कृषी विभागाचे अधिकारी

डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयात बेकायदेशीर जैव उत्तेजक खतांचा साठा; ‘कृषी मित्र’ भरतीवर फसवणुकीचा गंभीर आरोप

Leave a Comment