हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रात्री १ वाजता काळाने गाठलं; भरधाव कारखाली दोन सुरक्षारक्षकांचा दुर्दैवी अंत

On: May 17, 2026 11:09 AM
Follow Us:
खामगावमध्ये भरधाव वॅगनार कारखाली दोन सुरक्षारक्षकांचा दुर्दैवी मृत्यू

खामगाव |कट्टा न्यूज नेटवर्क 

खामगावातील भरधाव कार अपघाताने शहर हादरले असून मध्यरात्री दोन सुरक्षा रक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नांदुरा रोडवरील या भीषण वॅगनार अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली आहे. भरधाव वेगातील कारने रोडलगत ड्युटीवर बसलेल्या दोन्ही सुरक्षारक्षकांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

खामगाव शहरातील नांदुरा रोडवरील हॉटेल पुष्पांजलीसमोर १४ मेच्या मध्यरात्रीनंतर हा भीषण अपघात घडला. घाटपुरी तक्षशिलानगर येथील गोविंदा किसन शेगोकार (वय ६४) हे हॉटेल पुष्पांजली येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. तर विवेक देविदास पायघण (वय ४१) हे शेजारील सुपर नवरंग येथे सुरक्षा रक्षकाची जबाबदारी सांभाळत होते.माहितीनुसार, रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास दोघेही रोडलगत खुर्ची टाकून ड्युटीवर बसले होते. त्याचवेळी नांदुराकडून भरधाव वेगात येणाऱ्या एमएच १५ जीएफ ८०७३ क्रमांकाच्या मारुती सुझुकी वॅगनार कारने दोघांनाही जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. रात्रीच्या शांततेत अचानक झालेल्या या भीषण धडकेने स्थानिक नागरिक हादरले. सकाळपासून शहरभर या घटनेची चर्चा सुरू होती. सुरुवातीला कारमध्ये महिला असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिस तपासातून प्रितपालसिंग अमरजितसिंग संधू (वय ५४) हा कार चालवत असल्याचे स्पष्ट झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चालक प्रितपालसिंग संधू हे लग्न समारंभातून घरी परतत होते. त्याचदरम्यान हा भीषण अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून कारचा शोध घेतला आणि काही वेळातच वाहन जप्त करत चालकाला अटक केली.

या प्रकरणी राजेंद्र किसन शेगोकार यांनी खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०६(१), १२५(अ)(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १२४/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या भीषण अपघातामुळे खामगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून भरधाव वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


👉 KattaNews.in ला Follow करा

महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज, अपघात, गुन्हेगारी, राजकीय आणि वायरल बातम्यांचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी KattaNews.in ला  Follow करा.


Related News


 

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment