हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

100% नुकसान, तरीही पिक विमा नाही! बुलढाण्यात शेतकऱ्यांचा एल्गार; 29 एप्रिलपासून आमरण उपोषण

Follow Us:
बुलढाणा शेतकरी आंदोलन पिक विमा नुकसान भरपाई

बुलढाणा : प्रा.दिलीप नाईकवाड

अतिवृष्टीमुळे पिकांचे 100% नुकसान होऊनही पिक विमा मिळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून आला आहे. सिंदखेडराजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठा एल्गार पुकारत 29 एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. पिक विमा कंपनी आणि कृषी विभागाकडून ‘नुकसान झाले नाही’ असा दावा करण्यात येत असल्याने शेतकरी संतप्त झाले असून हा प्रश्न आता राज्यभर गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सिंदखेडराजा येथील पंचायत समिती सभागृहात शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, खरीप 2025 हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, मात्र विमा कंपन्या आणि संबंधित विभागाकडून दावे फेटाळले जात आहेत.

या अन्यायाविरोधात आवाज उठवत 29 एप्रिलपासून अन्नत्याग आमरण उपोषण करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच 1 मे महाराष्ट्र दिनी काळीगुडी उभारून शासनाचा निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकरी योद्धा कृती समितीने राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांना तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांशी थेट चर्चा करून पिक विम्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करून टप्प्याटप्प्याने पुढे नेले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत या लढ्यात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील हा मुद्दा आता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.


👉 हे आवश्यक करा..

तुमच्या भागातही पिक विम्याबाबत अडचणी आहेत का? तुमचा अनुभव आम्हाला पाठवा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.


👉 हे पण वाचा..

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

Leave a Comment