खामगाव|विशाल गवई
खामगाव (Breaking Crime News): आनंदाच्या लग्न समारंभात अचानक उसळलेल्या वादाने भीषण वळण घेत २२ वर्षीय तरुणाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. DJ समोर नाचताना लागलेल्या किरकोळ धक्क्यावरून सुरू झालेला वाद काही क्षणातच रक्तरंजित हल्ल्यात बदलला आणि या घटनेने संपूर्ण खामगाव हादरले आहे. ही घटना २५ एप्रिलच्या रात्री बर्डे प्लॉट परिसरात घडली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली आहे.
सुरुवातीला शाब्दिक वाद असलेला हा प्रकार काही वेळातच गंभीर मारहाणीत बदलला. आरोपींनी संगनमत करून चाकू, फायटर, वस्तरा आणि दगडाने जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत शोएब खान याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवाजीनगर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला असून डीबी पथकाने तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली आहे. चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
एका क्षणाच्या रागामुळे एका तरुणाचा जीव गेला — ही घटना समाजासाठी मोठा इशारा ठरत आहे.
👉 हे पण वाचा…
- बहिणीच्या वाढदिवशीच शिंदीतील 27 वर्षीय धीरज गवईचा पवना डॅममध्ये बुडून मृत्यू
- पोलीस जावयावर सासू-सासऱ्यांचा हल्ला; बेल्ट-काठीने बेदम मारहाण करत नग्न करण्याचा प्रयत्न
- मध्यरात्री बिअर शॉपी फोडून लाखोंचा माल लंपास
📢 हे आवश्यक करा..
तुमच्या भागातील अशाच Breaking Crime News, Exclusive अपडेट्स आणि Viral बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी Kattanews.in ला Follow करा.
👉 WhatsApp / Telegram वर शेअर करा आणि इतरांनाही माहिती द्या.










