सिंदखेडराजा/समाधान सरकटे
मात्र सरपंच थेट जनतेतून निवडून आल्यामुळे तहसीलदार अजित दिवटे यांनी 16 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा बोलावली. या ग्रामसभेत अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले आणि इथेच चित्र पूर्णपणे बदलले.
अविश्वास ठरावाच्या बाजूने 151 मते पडली, तर विरोधात तब्बल 190 मते पडली. त्यामुळे 39 मतांच्या फरकाने हा ठराव नामंजूर ठरला आणि सरपंच सौ. नलिनी राजेंद्र गरड यांचे पद कायम राहिले.
यापूर्वी सदस्यांनी सरपंचांवर अनेक गंभीर आरोप केले होते. निर्णय प्रक्रियेत सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही, विकासकामांमध्ये अनियमितता आहे, प्रशासनात पारदर्शकता नाही, तसेच सदस्यांशी असहकार्य अशी तक्रारी करण्यात आल्या होत्या.
तथापि ग्रामसभेत जनतेने सरपंचांवर विश्वास दाखवत सर्व आरोपांना अप्रत्यक्षरित्या नाकारले. निकाल जाहीर होताच उपस्थित नागरिकांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला आणि गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
या निकालामुळे खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा स्थैर्य निर्माण झाले असून, पुढील काळात विकासकामांना गती मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📢 हे आवश्यक करा..
👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी KATTANEWS.IN ला दररोज भेट द्या.
👉 ही बातमी शेअर करा आणि आपल्या भागातील अपडेट्स सर्वांपर्यंत पोहोचवा.
🔗 Related News














