हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धाडमध्ये अन्नातून विषबाधेची शंका; ३ लहान मुलांचा मृत्यू, आईवर उपचार सुरू

On: April 7, 2026 6:52 PM
Follow Us:
धाड गावात अन्नातून विषबाधेमुळे ३ लहान मुलांचा मृत्यू

बुलढाणा |७ एप्रिल २०२६

जिल्ह्यातील धाड येथे अन्नातून विषबाधेची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेत एका कुटुंबातील तीन लहान मुलांचा मृत्यू झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणामुळे गावात शोककळा पसरली आहे. आई व एक मुलगी गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धाड येथील जमादार कुटुंबातील मोहम्मद वसीम जमादार (वय ४), मशीरा मोहम्मद जमादार (वय ७) आणि फातिमा मोहम्मद वसीम (वय ८) या तिघांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे.कुटुंबातील सदस्यांना ४ एप्रिलपासून मळमळ आणि अस्वस्थता जाणवत होती. सुरुवातीला घरगुती उपचार करण्यात आले, मात्र प्रकृती बिघडत गेल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ६ एप्रिल रोजी सकाळी दोन मुलांचा, तर रात्री एका मुलीचा मृत्यू झाला.आई अफरीन मोहम्मद वसीम (वय ३४) आणि आणखी एक मुलगी यांची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पुढील तपास धाड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे करत आहेत.

या घटनेमुळे धाड गावात शोकाचे वातावरण असून नागरिकांकडून या कुटुंबाबद्दल सहवेदना व्यक्त करण्यात येत आहे.

👉 ताज्या, विश्वासार्ह आणि जलद बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरेचे भाव आजचे आणि साखरेचे आजचे बाजार भाव

साखरेचे भाव आजचे किती? साखरेचे बाजार भाव वाढले; साखरेचे भाव वाढण्याचे कारण काय?

हनवतखेडमध्ये बकरी गिळणारा महाकाय अजगर मृतावस्थेत

बकरी गिळणारा महाकाय अजगर मृतावस्थेत; हनवतखेडच्या शिवारात खळबळ, दुसरा अजगर असल्याने शेतकऱ्यांत भीती

मलकापूर पांग्रा शाळेच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी

मलकापूर पांग्रा शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत दमदार कामगिरी; मोहिनी मगर तालुक्यात द्वितीय

मेरा बुद्रुकचे शुभम डोंगरदिवे UPSC यशानंतर सनदी अधिकारी

मेरा बुद्रुकच्या सुपुत्राची UPSC मध्ये झेप; शुभम डोंगरदिवे यांची सनदी अधिकारी म्हणून गुजरातमध्ये नियुक्ती

चिखली दरेगाव मार्गावर मुक्कामी एसटी बस सुरू करण्याची मागणी

सायंकाळी बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; चिखली–दरेगाव मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी

Buldhana News - चिखलीत अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चाचा इशारा

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात चिखलीत महामोर्चाचा इशारा; ८ सप्टेंबरला तहसील कार्यालयावर आंदोलन

Leave a Comment