हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

पोलीस होण्याचं स्वप्न… पण तिसऱ्याच फेरीत आयुष्य संपलं; पुण्यात भरतीदरम्यान देऊळगाव राजातील तरुणाचा मृत्यू

On: March 29, 2026 6:17 PM
Follow Us:
Pune Police Bharti running test youth death incident

देऊळगाव राजा| २९ मार्च २०२६

पुणे पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 1600 मीटर धावण्याच्या चाचणीदरम्यान देऊळगाव राजातील 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, चिंचोली बुरकुल गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर मैदानावर सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत संबंधित तरुणाने दोन फेऱ्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या होत्या. मात्र तिसऱ्या फेरीत धावत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो मैदानावर कोसळला.घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी आणि उमेदवारांनी तातडीने त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, त्याला ‘फिट’सारखा झटका आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलीस होण्याचं स्वप्न डोळ्यांत साठवून दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या या तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वडील गेल्या काही वर्षांपासून आजारी असून, कुटुंबाचा आधार असलेला मुलगाच हरपल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेमुळे पोलीस भरती प्रक्रियेतील उमेदवारांच्या आरोग्य तपासणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.


👉 Related News


📢 हे आवश्यक करा :

अशाच महत्वाच्या आणि अपडेट बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट देत राहा.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

निलगायीच्या धडकेत अपघात झालेले शिवाजी धोंडूजी तुपकर

गुंज गावात हळहळ: निलगायीच्या धडकेत झालेल्या अपघातात जखमी मजुराचा अखेर मृत्यू

बुलढाणा दुष्काळ नुकसान भरपाई मागणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर एकनाथ शिंदे यांची भेट

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ नुकसान भरपाई मिळणार? आमदार खेडेकरांच्या मागणीनंतर शिंदेंचं मोठं आश्वासन

रताळी येथील शेतकरी पुत्र आकाश बळीराम पाटील आत्महत्या

दुष्काळ जाहीर होण्याच्या काही तास आधीच रताळीत शेतकरी पुत्राची आत्महत्या; शेतीचे नुकसान अन् कर्जाचा ताण

महाराष्ट्रात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, मुख्यमंत्री फडणवीस

मोठी बातमी! महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मिळणार ‘या’ सवलती

विदर्भातील शेतकरी-शेतमजुरांसाठी राहुल गांधींना सुबोध सावजींचे आमंत्रण

विदर्भातील शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी राहुल गांधींनी यावे; सुबोध सावजींची ‘किसान एवं खेत मजदूरों की आवाज’ कार्यक्रमाची मागणी

केंद्रीय मंत्र्यांच्या गावाला जाणारी मोडकळीस एसटी बस, तारांनी बांधलेला पत्रा

केंद्रीय मंत्र्यांच्या मूळ गावाला जाणारी एसटीच मोडकळीस; तारांनी बांधलेली, पत्र्याच्या ठिगळाची बस… म्हणावी की धोक्याची सफर ?

Leave a comment