हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धक्कादायक! खून प्रकरणातील आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग… चिखली पोलिसांनी २ जणांना पकडलं

On: March 28, 2026 2:35 PM
Follow Us:
चिखली खून प्रकरण आरोपी अटक पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

चिखली प्रतिनिधी |२८ मार्च २०२६

खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी चिखली पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत मोठी कारवाई केली आहे. या घटनेत ५० मीटर फरपटत नेऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी अनिल मारोती शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आणि मृतक गणेश भागवत गुडडा हे हदगाव येथून छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. परत येताना चिखली हद्दीत केळवद येथे हॉटेल गुलमोहर जवळ थांबले असता Swift Dzire कारमधील काही जणांशी त्यांचा वाद झाला.

या वादाचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले. आरोपींनी गणेश यांना चापटा, बुक्के व काठीने मारहाण केली. त्यानंतर गाडीच्या दरवाज्यात अडकवून अंदाजे ५० मीटर फरपटत नेल्याचा गंभीर प्रकार समोर आला. उपचारादरम्यान गणेश यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष पथके तयार करण्यात आली.

तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी शेख शाहरुख शेख प्यारु आणि सुप्रबुध्द महादेव हिवराळे (रा. बोथा काजी) यांचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी बोथा काजी परिसरात सापळा रचला असता आरोपींची Swift Dzire कार समोरून येताना दिसली.

पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पळ काढला. मात्र पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत त्यांना पकडले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता ३० मार्च २०२६ पर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी (PCR) मंजूर करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक भूषण गावंडे व त्यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली.


👉 Related News


📢 Call To Action

अशाच ब्रेकिंग आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. तुमच्या मित्रांसोबत ही बातमी शेअर करा.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment