हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्डा हादरलं! कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान ठरलं कारण?

On: March 22, 2026 7:39 AM
Follow Us:
साखरखेर्डा येथे कर्जबाजारी शेतकरी संतोष खरात आत्महत्या, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

साखरखेर्डा |२२ मार्च २०२६

साखरखेर्डा येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष शंकर खरात (वय ४७) यांनी राहत्या घरात पंख्याला दोर लावून गळफास घेत आपले जीवन संपवले. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान आणि वाढता कर्जाचा ताण यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

ही हृदयद्रावक घटना २१ मार्च रोजी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली. संतोष खरात यांच्याकडे सुमारे १ हेक्टर ६२ आर शेती असून कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णपणे शेतीवर अवलंबून होता. आई, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतीसाठी बँकेतून कर्ज काढून पेरणी करण्यात आली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढत गेल्या आणि संतोष खरात मानसिक तणावाखाली होते.

विशेष म्हणजे, त्यांच्या एका मुलीचा विवाह अवघ्या एका महिन्यापूर्वी झाला होता. अशा परिस्थितीत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली. संतोष खरात हे मनमिळावू आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले व्यक्ती होते, त्यामुळे त्यांच्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पोंधे यांनी प्राथमिक अहवाल तहसीलदार अजित दिवटे यांना सादर केला आहे. तसेच ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.


📢 Related News


📢 हे आवश्यक करा 

👉 अशा महत्वाच्या आणि ताज्या अपडेटसाठी Kattanews.in ला भेट देत रहा.

👉 ही बातमी शेअर करून इतरांपर्यंत नक्की पोहोचवा.

 

अशोक इंगळे

अशोक इंगळे हे Kattanews.in चे वरिष्ठ पत्रकार असून त्यांना २५ वर्षांपेक्षा जास्त पत्रकारिता क्षेत्राचा अनुभव आहे. ग्रामीण भागातील घडामोडी, शेतकरी प्रश्न, स्थानिक घटना, राजकीय व सामाजिक विषयांवर ते सखोल आणि विश्वासार्ह रिपोर्टिंग करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश, चिखलीचे माजी आमदार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश: पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींचा फोन? चिखलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

Leave a Comment