हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

Maharashtra Weather Alert : 17 ते 20 मार्च राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; शेतकऱ्यांना पंजाबराव डख यांचा इशारा

On: March 15, 2026 2:25 PM
Follow Us:
Maharashtra Weather Alert heavy rain forecast by Punjabrao Dakh from 17 to 20 March
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

पुणे |कट्टा न्यूज नेटवर्क

Maharashtra Weather Alert : राज्यात येत्या आठवड्यात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 17 ते 20 मार्च दरम्यान महाराष्ट्रात पावसाळ्यासारखा धो-धो पाऊस पडणार असल्याचा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे लवकर पूर्ण करून काढणीस आलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत माहिती देताना पंजाबराव डख म्हणाले की,(Maharashtra Weather Alert) थंडी संपल्यानंतर अचानक तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे वातावरणात बाष्प तयार होत असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात पावसाचे वातावरण निर्माण होणार आहे.

16 मार्चपासून वातावरणात बदल होण्यास सुरुवात होईल. वारे वाढतील आणि आभाळ दाटून येईल. त्यानंतर 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते.

पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या भागात पावसाचा प्रभाव जास्त राहण्याची शक्यता आहे. बुलढाणा, जालना आणि परभणी जिल्ह्यांमध्ये 18 आणि 19 मार्च रोजी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हा पाऊस केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्येही पडण्याची शक्यता आहे. ज्या भागात पाऊस पडणार नाही, त्या ठिकाणी जोरदार वारे वाहू शकतात.

Soyabean Bhav Today: आज बुलढाणा जिल्ह्यात कुठे किती मिळतो सोयाबीनचा दर ?

गहू, हरभरा, हळद आणि कांदा यांसारखी काढणीस आलेली पिके 16 मार्चपूर्वी काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, असे आवाहन (Maharashtra weather alert) पंजाबराव डख यांनी केले आहे.

हे पण वाचा..

धरण पायथ्याशी गाव, तरीही पाण्यासाठी भटकंती! लिंगा (साखरखेर्डा) गावकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

दरम्यान, 24 ते 26 मार्च दरम्यान राज्यात पावसाचा दुसरा टप्पा येण्याची शक्यता आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात या काळात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


📢 WhatsApp वर ब्रेकिंग न्यूज मिळवण्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा

Kattanews.in वर वाचा ताज्या बातम्या.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Leave a Comment