हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

शिवजयंतीनिमित्त कवी अज़िम नवाज राही यांना ‘शिवसन्मान’; उर्दू मातृभाषा असूनही मराठी साहित्यसेवेचा गौरव

On: February 20, 2026 12:59 PM
Follow Us:
शिवजयंती निमित्त कवी अज़िम नवाज राही यांचा शिवसन्मान

साखरखेर्डा | सिंदखेडराजा तालुका | बुलढाणा |२० फेब्रुवारी २०२६

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त साखरखेर्डा येथे प्रतिभावान कवी तथा साहित्यिक अज़िम नवाज राही यांचा शिवसन्मान करून गौरव करण्यात आला. उर्दू मातृभाषा असूनही मराठी साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल स्थानिक छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीने सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या अज़िम नवाज राही यांनी उर्दू माध्यमातून शिक्षण घेतले असले तरी त्यांनी मराठी भाषेवर अप्रतिम प्रभुत्व मिळवले. त्यांनी मराठीमध्ये काव्यरचना करून साहित्यविश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असून त्यांच्या कार्यामुळे साखरखेर्डा नगरीचे नाव राज्यभर पोहोचले आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

केवळ इयत्ता नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राही यांच्या कविता आज अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ते राज्यातील उत्कृष्ट निवेदकांपैकी एक मानले जातात आणि मराठी साहित्य क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे.

उर्दू भाषिक असूनही मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी झोकून देऊन कार्य करणाऱ्या या साहित्यिकाचा शिवजयंती निमित्त गौरव करण्यात आल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

याप्रसंगी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुधाकर पऱ्हाड, कार्यकारी अध्यक्ष सुनील रिंढे, कोषाध्यक्ष अरूण देशमुख, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, उद्योजक गीताराम तायडे, मार्गदर्शक माजी प्राचार्य देविदास पांचाळ, राजू काटे, पवन जाधव, सोनू पवार आदींची उपस्थिती होती.


📌 Related News


👉 स्थानिक बातम्या, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि ताज्या घडामोडींसाठी भेट द्या:
www.Kattanews.in

 

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

केकतउमरा येथे प्रा विठ्ठल कांगणे यांचे फुले आंबेडकर जयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यान

तरुणांसाठी सुवर्णसंधी! केकतउमरा येथे आज प्रा. विठ्ठल कांगणे यांचे प्रेरणादायी व्याख्यान

कवी अजीम नवाज राही साखरखेर्डा येथे लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार 2025 निमित्त सत्कार

साखरखेर्डा गावाचा अभिमान! ‘वळीवाच्या वेळा’ कवितासंग्रहासाठी कवी अजीम नवाज राही यांना लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार 2025

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात 632 शिक्षकांवर कारवाई

632 शिक्षकांवर मोठी कारवाई! शालार्थ आयडी घोटाळ्यात नियुक्त्या अवैध; वेतन थांबवून पगार वसुलीचे आदेश

आदर्श विवाह सोहळ्यात वधू-वर आणि मान्यवर उपस्थित

बोले तैसा चाले! ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या मुलाचा साधेपणात पार पडलेला आदर्श विवाह चर्चेत

तुषार डोडिया महेश आयडॉल सीझन 14 राष्ट्रीय स्पर्धेत देशातून द्वितीय क्रमांक पटकावताना

राष्ट्रीय पातळीवर बुलढाण्याचा डंका! ‘महेश आयडॉल 14’ मध्ये तुषार डोडिया उपविजेता

वैदुवाडी जि.प. शाळेत बोगस विद्यार्थी दाखवून अनुदान घोटाळ्याचा आरोप, चिखली पंचायत समिती

वैदुवाडी जि.प. शाळेत बोगस विद्यार्थी प्रकरण उघड! चौकशी अहवाल दाबला? 420 अंतर्गत कारवाईची मागणी, 23 फेब्रुवारीपासून उपोषणाचा इशारा

Leave a Comment