हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

पांग्रीकाटे येथे शेतात अफू शेतीचा भांडाफोड! दीड कोटींचा माल जप्त; दोन आरोपी अटकेत

On: February 17, 2026 6:43 PM
Follow Us:
पांग्रीकाटे येथे पोलिसांनी जप्त केलेली अफू शेती

साखरखेर्डा | १७ फेब्रुवारी २०२६

पांग्रीकाटे येथे अफू शेती, पोलिस कारवाई आणि NDPS कायद्यांतर्गत गुन्हा नोंद अशी मोठी घटना उघडकीस आली आहे. पोलिसांच्या संयुक्त छाप्यात बेकायदेशीर अफू लागवड नष्ट करून तब्बल 1.32 कोटी रुपयांचा अफू साठा जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून ड्रग्ज शेतीविरोधात प्रशासनाची कठोर भूमिका स्पष्ट झाली आहे.

साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील पांग्रीकाटे गावात दोन शेतकऱ्यांनी शेतात अफू (खसखस) लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पोलिस, महसूल व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई केली.उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे, सिंदखेडराजा येथील नायब तहसीलदार संदीप बंगाळे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निबंधक आनंद शिंदे यांनी साखरखेर्डा, गोरेगाव व पांग्रीकाटे परिसरात पाहणी केली असता गट क्रमांक १४८ व १२८ मधील शेतात अफू लागवड सुरू असल्याची माहिती मिळाली.

संयुक्त पथकाने प्रत्यक्ष शेतात छापा टाकला असता भागवत सदाशिव काटे हे अफू पिकाला पाणी देताना आढळले. त्यांच्या शेतातून जप्त करण्यात आलेल्या अफूचे वजन १०७ किलो ६६० ग्रॅम असून बाजारमूल्य सुमारे ८६ लाख १२ हजार ८०० रुपये आहे.

तसेच विशाल रमेश काटे यांच्या शेतातून ५७ किलो ३२० ग्रॅम अफू जप्त करण्यात आली असून त्याची किंमत ४५ लाख ८५ हजार ६०० रुपये आहे. एकूण १६४ किलो ९८० ग्रॅम अफू जप्त करण्यात आली असून एकूण किंमत १ कोटी ३२ लाख ९८ हजार ४०० रुपये इतकी आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत ठाणेदार गजानन करेवाड, ग्राम महसूल अधिकारी आनंद राजपूत, कृषी सहायक छबुलाल कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक गणेश कड तसेच पोलिस व महसूल विभागाचे कर्मचारी सहभागी होते.

पोलीस उपनिरीक्षक गणेश कड यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध NDPS कायद्यांतर्गत कलम ८(क) व १८(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साखरखेर्डा पोलीस करत आहेत.


हे पण वाचा..


👉 आपल्या परिसरातील ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज भेट द्या:
Kattanews.in

 

सुनिल अंभोरे

सुनिल अंभोरे हे आपल्या न्यूज नेटवर्कचे विश्वासार्ह आणि सक्रिय वार्ताहर असून ग्रामीण, सामाजिक, प्रशासकीय तसेच जनहिताच्या विषयांवर सातत्याने लेखन करतात. स्थानिक पातळीवरील घडामोडी अचूक, निष्पक्ष आणि तथ्यांच्या आधारे वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देणारी पत्रकारिता करण्यावर त्यांचा भर आहे. बातमी लेखनात पारदर्शकता, विश्वसनीय स्रोत आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा श्री व्यंकटेश महाविद्यालयातील अभिजात मराठी भाषा सप्ताह कवी संमेलन

देऊळगाव राजात अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त कवी संमेलन; साहित्यिकांनी समाज जागृत ठेवावा – डॉ. शशिकांत पाटील

सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा परिसरात वाळत चाललेली कपाशीची झाडे

सिंदखेडराजा तालुक्यात २० हजार हेक्टरवरील कपाशी बाधित; कापूस येण्याआधीच पाती गळाली, शेतकरी संकटात

पिक कर्जासाठी स्टॅम्प पेपरच्या सक्तीबाबत बँकांना निर्देश

पिक कर्जासाठी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर नको; संजय खडसेंचे बँकांना स्पष्ट निर्देश

सोमठाणा तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीच्या आत्मसमर्पणाची बातमी

सोमठाणा तिहेरी हत्याकांडात मोठी घडामोड; मुख्य आरोपी दीपक सुरडकर पनवेलमध्ये शरण, मुलालाही अटक

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात MPSC विद्यार्थ्यांचे निवेदन

MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी डॉ. ज्योतीताई खेडेकर मैदानात; ३५० ते ४०० विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चिखली तालुक्यात अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाची कारवाई

चिखलीत अनधिकृत पाणी उपसा केल्यास पंप जप्त होणार; वीजपुरवठा खंडित करण्याचाही इशारा

Leave a comment