वाशिम | (दि. 26 एप्रिल 2026)
केकतउमरा येथे या महत्त्वाच्या कार्यक्रमामुळे आज परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसिद्ध व्याख्याते प्रा. विठ्ठल कांगणे यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याने युवक, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.
प्रा. विठ्ठल कांगणे हे स्वामी विवेकानंद अकॅडमी, परभणीचे संचालक असून महाराष्ट्रातील तरुणांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या प्रबोधनपर विचारांमुळे अनेक युवकांना नवी दिशा मिळत आहे.
या कार्यक्रमास युवक-युवती तसेच परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त प्रदिप पट्टेबहादूर आणि पंचशील क्रीडा मंडळ, केकतउमरा यांनी केले आहे.
दरम्यान, 27 एप्रिल रोजी दुपारी 12:30 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, सायंकाळी 8 ते 11 या वेळेत सुप्रसिद्ध लोककवी प्रकाशनाथ पाटणकर (नागपूर) यांच्या भीमगीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
👉 संबंधित बातम्या
- Breaking Crime: पोलीस जावयावर सासू-सासऱ्यांचा हल्ला; बेल्ट-काठीने बेदम मारहाण करत नग्न करण्याचा प्रयत्न
- धक्कादायक! ‘तु लय माजला का?’ म्हणत लोखंडी दातड्याने युवकावर हल्ला; रिसोडमध्ये खळबळ
- रिसोडमध्ये पाण्याचा मोठा संकट: पिवळ्या पाण्यामुळे नागरिक हैराण, आठवड्यातून फक्त एकदाच पुरवठा
📢 हे पण वाचा..
अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. ही बातमी आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.










