हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

लोणावळा दुर्घटना : मेहकरच्या प्रज्वल गिरीचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू, सर्वत्र हळहळ

Follow Us:
लोणावळा येथे दरीत कोसळून मृत्यू झालेला मेहकरचा तरुण प्रज्वल गिरी

बुलढाणा |११ फेब्रुवारी २०२६

लोणावळा दुर्घटना पुन्हा एकदा मन हेलावून टाकणारी ठरली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील तरुण प्रज्वल वसंत गिरी यांचा
८ फेब्रुवारी रोजी लोणावळा येथे दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना समजताच मेहकरसह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
प्रज्वल गिरी हा पुणे येथे बी.एड. शिक्षणासोबत एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता.

प्रज्वल गिरी हा प्रसिद्ध व्याख्याते, साहित्यिक व रंगकर्मी
प्रा. वसंत गिरी यांचा २६ वर्षीय एकुलता एक पुत्र होता.
८ फेब्रुवारी रोजी तो नातेवाईकांसोबत मुंबईहून पुण्याकडे प्रवास करत असताना
लोणावळा येथे अल्पोपहारासाठी थांबला होता.

यावेळी प्रज्वल व त्याचा मावसभाऊ टेकडीवरून थोडे फिरून येतो असे सांगून गेले.
मात्र तोल न सांभाळल्याने पाय घसरून प्रज्वल थेट खोल दरीत कोसळला.
या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

प्रा. वसंत गिरी हे मेहकर एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले असून
त्यांनी “तुमचं वऱ्हाड निघालं लंडनला” या गाजलेल्या एकपात्री प्रयोगाचे
महाराष्ट्रभर ५०० पेक्षा अधिक प्रयोग सादर केले आहेत.
तसेच क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोगांचे
हजारहून अधिक प्रयोग त्यांनी केले आहेत.

प्रज्वलच्या अकाली जाण्याने गिरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय पुण्याकडे रवाना झाले होते.

प्रज्वल गिरी यांच्या पार्थिवावर १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता
मेहकर येथील जानेफळ रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त
केले जात असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


📰 Related News


👉 अशाच विश्वासार्ह, वेगवान आणि सखोल बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

 

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

निलगायीच्या धडकेत अपघात झालेले शिवाजी धोंडूजी तुपकर

गुंज गावात हळहळ: निलगायीच्या धडकेत झालेल्या अपघातात जखमी मजुराचा अखेर मृत्यू

बुलढाणा दुष्काळ नुकसान भरपाई मागणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर एकनाथ शिंदे यांची भेट

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ नुकसान भरपाई मिळणार? आमदार खेडेकरांच्या मागणीनंतर शिंदेंचं मोठं आश्वासन

रताळी येथील शेतकरी पुत्र आकाश बळीराम पाटील आत्महत्या

दुष्काळ जाहीर होण्याच्या काही तास आधीच रताळीत शेतकरी पुत्राची आत्महत्या; शेतीचे नुकसान अन् कर्जाचा ताण

महाराष्ट्रात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, मुख्यमंत्री फडणवीस

मोठी बातमी! महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मिळणार ‘या’ सवलती

विदर्भातील शेतकरी-शेतमजुरांसाठी राहुल गांधींना सुबोध सावजींचे आमंत्रण

विदर्भातील शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी राहुल गांधींनी यावे; सुबोध सावजींची ‘किसान एवं खेत मजदूरों की आवाज’ कार्यक्रमाची मागणी

केंद्रीय मंत्र्यांच्या गावाला जाणारी मोडकळीस एसटी बस, तारांनी बांधलेला पत्रा

केंद्रीय मंत्र्यांच्या मूळ गावाला जाणारी एसटीच मोडकळीस; तारांनी बांधलेली, पत्र्याच्या ठिगळाची बस… म्हणावी की धोक्याची सफर ?

Leave a comment