हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रिठद शिवारात चोरांचा सुळसुळाट! स्प्रिंकलर तोट्यांची चोरी; पोलिस तपासावर शेतकऱ्यांचा संताप

Follow Us:
रिठद शिवारात स्प्रिंकलर तोट्यांची चोरी झाल्याने संतप्त शेतकरी
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

वाशिम | १० फेब्रुवारी २०२६

रिठद शिवार चोरी, स्प्रिंकलर तोट्या चोरी, रिसोड तालुका शेतकरी समस्या
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रिठद गावाच्या शेतशिवारात सध्या चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
रब्बी पिकासाठी शेतकऱ्यांनी उभारलेल्या स्प्रिंकलरच्या तोट्यांची वारंवार चोरी होत असून, पोलिस तपासाची दिशा अद्यापही सापडलेली नाही.
चोर मोकाट फिरत असल्याने शेतकरी कमालीचे संतप्त आणि चिंताग्रस्त झाले आहेत.

रिठद व येवती शिवारात यापूर्वी दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी रात्री स्प्रिंकलरच्या तोट्यांची चोरी झाली होती.
त्यानंतर पुन्हा ४ फेब्रुवारी २०२६ रोजी अशाच प्रकारे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
मात्र अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, या चोरीबाबत पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा अनुभव आला.

तक्रारी करूनही त्यावर काय कार्यवाही झाली, तपास कुठपर्यंत पोहोचला, हे आजतागायत शेतकऱ्यांना समजलेले नाही.
त्यामुळे पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे? असा थेट सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

या परिसरात रिसोड, शिरपूर आणि वाशिम पोलीस स्टेशन अंतर्गत यापूर्वीही चोरीच्या अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
मात्र एकाही प्रकरणाचा ठोस तपास लागलेला नसल्याने पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मागील अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले होते.
तरीही कसाबसा तग धरत रब्बी पिकातून उत्पन्न मिळेल या आशेवर दोन-दोन तास पाणी देत शेती वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अशा परिस्थितीत स्प्रिंकलरच्या तोट्यांची चोरी म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीचा कणा मोडल्यासारखेच आहे.

या चोरीत रिठद शिवारातील प्रवीण हरिभाऊ आरू, विजय आरू, शिरीष राजेंद्र राऊत, नारायण बानाजी आरू, रविशंकर महादेव आरू, रामेश्वर विठोबा आरू, उत्तम सोपान आरू, अशोक हरिभाऊ आरू, किसन नामदेव आरू, मदन हैबती आरू, रवि चंद्रकांत आरू, तुळशीराम नारायण आरू, गजानन प्रल्हाद आरू, यादव ज्ञानबा आरू, संजय लक्ष्मण आरू, नारायण ज्ञानबा बोरकर, गजानन निवृत्ती आरू यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे की, वाशिम, रिसोड व शिरपूर या तिन्ही पोलीस स्टेशनच्या समन्वयाने
संयुक्त तपास पथक नेमून चोरीचा तातडीने छडा लावावा.
वेळीच चोरट्यांना अटक झाली नाही, तर रिठद महसूल मंडळातील शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


📢 शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी Kattanews.in सोबत रहा.

📝 तुमच्या परिसरातील बातम्या, समस्या किंवा तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचवा.

Related News

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Leave a Comment