हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

आज सर्वच समाजाला संत विचारांची गरज : रिसोडमध्ये आगळी-वेगळी संत रविदास जयंती उत्साहात साजरी

On: February 6, 2026 12:12 PM
Follow Us:
रिसोड येथे संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी करताना उपस्थित मान्यवर

 रिसोड |४ फेब्रुवारी २०२६

रिसोड : रिसोड शहरात संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि सामाजिक एकोपा जपत साजरी करण्यात आली. रिसोड चर्मकार प्रबोधिनी तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघ, रिसोड यांच्या विद्यमाने स्थानिक सातारकर बाबा मंदिर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिसोड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भगवान दादा क्षीरसागर होते. तर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष विष्णू कदम व शिक्षण व आरोग्य सभापती संतोष चऱ्हाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष शिवश्री शिवाजी कवर, सातारकर महाराज संस्थानचे अध्यक्ष देशमुख, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष गजानन खंदारे, रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, शांतता समितीचे अध्यक्ष मंचकराव देशमुख, व्हॉईस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष रुपेश बाजड यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

कार्यक्रमाची सुरुवात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांनाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर गायकवाड सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन पानझाडे सर यांनी केले.

या वेळी विद्यार्थ्यांचा त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर सन्मान करण्यात आला. तसेच लहान मुलांनी संत रविदास महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

प्रमुख अतिथी म्हणून बोलताना मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष शिवश्री शिवाजी कवर यांनी संत रविदास महाराज यांच्या मानवतावादी व समतेच्या विचारांवर सखोल मार्गदर्शन केले. सर्व समाजांनी एकमेकांच्या जयंती एकत्र साजऱ्या केल्यास सामाजिक एकोपा अधिक दृढ होईल, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष भगवान दादा क्षीरसागर म्हणाले, “आजपर्यंत अनेक जयंती पाहिल्या; मात्र अशी सर्व समाजाला सोबत घेणारी व एकजुटीचे दर्शन घडवणारी जयंती यापूर्वी पाहायला मिळाली नाही. समाजबांधवांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.”

यासोबतच चर्मकार समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिसोड चर्मकार महासंघाचे तालुका अध्यक्ष रमेश खिराडे, शहराध्यक्ष पांडुरंग घायाळ, दिनकर कानडे, राहुल घायाळ, गणेश घायाळ, राधाकिसन जुंजारे, गजानन पदमने, विजय राजगुरू, राजू राजगुरू, प्रशांत थोटे, लक्ष्मण कानडे, पंढरी राजगुरू, संतोष फुलसावंगे, संतोष वानरे, आश्रु कानडे यांच्यासह सर्व चर्मकार समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.


📌 संबंधित बातम्या :

👉 अधिक अशाच सामाजिक, राजकीय व ग्रामीण भागातील बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

 

विजय जुंजारे

विजय जुंजारे हे रिसोड प्रतिनिधी असून वाशिम जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक घडामोडींचे कव्हरेज करतात.त्यांना २ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यक्रमांवर लक्ष ठेवतात. त्यांच्या बातम्या वाचकांना विश्वासार्ह आणि नेमकी माहिती देतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश, चिखलीचे माजी आमदार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश: पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींचा फोन? चिखलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

Leave a Comment