हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

संत गजानन महाराजांच्या पुतळ्यासाठीच्या चबुतऱ्यावर रातोरात शिवाजी महाराजांचा पुतळा; खामगावात चौघांवर गुन्हा

On: August 14, 2026 8:12 AM
Follow Us:
खामगावातील वाडी येथे चबुतऱ्यावर बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
खामगाव |विशाल गवई 

संत गजानन महाराजांच्या पालखीच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच खामगावजवळील वाडी येथे घडलेल्या एका प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संत गजानन महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी उभारलेल्या चबुतऱ्यावर रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला. १२ ऑगस्ट रोजी पहाटे हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकरणावर सामंजस्याने तोडगा निघाला नाही. अखेर पुतळा बसविणाऱ्या चौघांविरुद्ध खामगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वाडी येथील स्नेहल नगर आणि विनायक नगर परिसरातील काही भाविकांनी एकत्र येत जलंब रोडलगत संत गजानन महाराजांचा पुतळा बसविण्याची तयारी सुरू केली होती. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर चबुतरा उभारण्याचे काम करण्यात आले होते. या कामासाठी स्थानिक पातळीवर देणगीचे आवाहनही करण्यात आले होते. देणगीतून संत गजानन महाराजांचा पुतळा आणण्यात आल्याची माहिती आहे.

संत गजानन महाराजांची पालखी १८ ऑगस्ट रोजी खामगाव शहरात येणार आहे. पालखीच्या आगमनाच्या दिवशीच संत गजानन महाराजांचा पुतळा बसविण्याचे नियोजन करण्यात आले होते. चबुतऱ्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच रात्रीच्या वेळी त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला. दुसऱ्या दिवशी पहाटे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली.

घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलिसांनी तातडीने वाडी येथे धाव घेतली. परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवत नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान, काही ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जलाभिषेकही केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

या प्रकरणी वाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रविंद्र जनार्धन कांबळे यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार, छत्रपती चौक, स्नेहल नगर भागातील जलंब रोडच्या कडेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून सुमारे सहा फूट उंच सिमेंट-काँक्रिटच्या कॉलमवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून अनधिकृतपणे पुतळा बसविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी विश्वास विनायकराव देशमुख (वय ३३), संतोष उर्फ रोशन शर्मा (वय २२), विजय रमेश जाधव (वय ३५) आणि प्रथमेश उमेश सोळंके (वय २२), सर्व रा. वाडी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १८९ (२), १८९ (३), २२३, ३(५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ मधील संबंधित तरतुदींनुसार कारवाई केली आहे.

दरम्यान, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. खामगाव शहर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ विनोद शेळके या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन काही दिवसांवर आलेले असतानाच हा प्रकार घडल्याने प्रशासन आणि पोलिसांसमोर कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. या प्रकरणात पुढे प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे वाडी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

📲 खामगाव, बुलढाणा आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा


👉 KattaNews.in WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

टीप : या बातमीतील आरोप आणि गुन्ह्याची माहिती पोलिसांत दाखल तक्रारीवर आधारित आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेनंतर पुढील बाबी स्पष्ट होतील.

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

गवंढाळा ग्रामपंचायत अधिकारी निलंबित

“जनतेच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल!”; गवंढाळा ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर अखेर निलंबनाची कारवाई

देऊळगाव राजात पाच हजार रुपयांसाठी आईवर वीट मारल्याची घटना

जिच्या कुशीत वाढला, तिच्याच डोक्यात घातली वीट! पाच हजारांसाठी मुलाचा आईवर हल्ला; देऊळगाव राजात गुन्हा दाखल

शेंदुर्जनमध्ये एकाच घरात चार दिवसांत दोनदा चोरी

४ दिवसांत एकाच घरात सलग दोनदा चोरी; पहिल्यांदा सोनं-रोख लुटलं, दुसऱ्यांदा मौल्यवान साड्यांवर डल्ला

पेनटाकळी धरणात ३५ वर्षीय विष्णू राजेकर यांची आत्महत्या

पेनटाकळी धरणात ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; रात्री घरातून निघाला, सकाळी मृतदेह आढळला

सिनगाव जहांगीर येथे अवैध रेती वाहतुकीप्रकरणी जप्त केलेले दोन टिप्पर

पहाटे ३ वाजता महसूल पथकाची धडक; सिनगाव जहांगीरमध्ये दोन टिप्पर जप्त, रेतीमाफियांमध्ये खळबळ

जानेफळ नागेश्वर महादेव मंदिर चोरी प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ४८ तासांत जेरबंद केले

भक्तांनी श्रद्धेने दिलेले दानही सोडले नाही; मंदिरातील दानपेटी फोडणारा ४८ तासांत जेरबंद

Leave a Comment