हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

देशी दारूची अवैध विक्री, ग्रामस्थ हैराण; व्यसनामुळे तरुणाची आत्महत्या

On: February 3, 2026 5:23 PM
Follow Us:
डिग्रस बु येथे अवैध देशी दारू विक्रीमुळे ग्रामस्थ हैराण

देऊळगाव मही |३ फेब्रुवारी २०२६

तालुक्यातील डिग्रस बु येथे सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीमुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे. या अवैध व्यवसायामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होत असून, त्याचे गंभीर परिणाम समाजावर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दारूच्या व्यसनातून २४ जानेवारी २०२६ रोजी एका तरुणाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतरही संबंधित अवैध दारू विक्रेत्यांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.या गंभीर प्रकाराची दखल घेत ग्रामपंचायत डिग्रस बुमहात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती यांच्या वतीने ३० जानेवारी २०२६ रोजी अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गावातील काही व्यक्ती खुलेआम अवैध देशी दारू विक्री करीत असून, वारंवार समज देऊनही हा व्यवसाय बंद करण्यात आलेला नाही. उलट जाब विचारल्यास दादागिरी व दमदाटी केली जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

या संशयित व्यक्तींवर यापूर्वीही अंढेरा पोलिस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखा (LCB) बुलढाणा येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती अर्जात देण्यात आली आहे.

यामुळे संबंधित अवैध दारू विक्रेत्यांवर एम.पी.डी.ए. कायदा किंवा तडीपारी अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव तात्काळ पाठवावा, अशी ठाम मागणी ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीने केली आहे.

गावकऱ्यांनी अनेक वेळा ११२ क्रमांकावर फोन करून पोलिस प्रशासनाला माहिती दिली असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, कारवाईच्या अभावामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.


📢 Katta News आवाहन :
अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

 

शिवहरी मांटे

शिवहरी मांटे हे सामाजिक प्रश्न, ग्रामीण वास्तव आणि सर्वसामान्यांच्या अडचणी प्रभावीपणे मांडणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहेत. शेतकरी प्रश्न, सामाजिक अन्याय आणि स्थानिक समस्या यावर ते सातत्याने आवाज उठवतात. वास्तवदर्शी मांडणी, निर्भीड विचार आणि लोकहिताला प्राधान्य देणारी भूमिका ही त्यांची ओळख आहे. Kattanews.in माध्यमातून त्यांचे विचार आणि समाजाभिमुख लेखन वाचकांपर्यंत पोहोचते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

हर घर तिरंगा अभियानासाठी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी बुलढाणा जिल्हा सज्ज; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे मोठे आवाहन

साखरखेर्डा येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी

७५ गावांच्या प्रवाशांचा प्रश्न कधी सुटणार? साखरखेर्ड्यात सुसज्ज बसस्थानकासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे साकडे

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते अभिनेत्री व पत्रकार किरण वाघ यांना साई प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करताना

शिर्डीत किरण वाघ यांचा दुहेरी गौरव! ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’

लोणार नगरपरिषदेत घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात निवेदन देताना डॉ. गोपालसिंह बछिरे व शिवसेना उ.बा.ठा. पदाधिकारी

घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

उत्रादा ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव; अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

उत्रादा ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा; ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव, अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

एअरबॅगमुळे 75 वर्षीय वकिलाचा जीव वाचला; मेहकर येथे आयशरच्या धडकेत कारचा चक्काचूर

मेहकरमधील ज्येष्ठ वकिलाच्या कारला भरधाव आयशरची समोरून धडक; भीषण अपघातात कारचा चक्काचूर

Leave a Comment