हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

नगराध्यक्षा मापारी यांच्या पुढाकाराने लोणार सरोवरातील माँ कमळजा देवी मंदिराचा प्रश्न मार्गी लागणार

On: January 29, 2026 11:06 AM
Follow Us:
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

लोणार | दिनांक : २९ जानेवारी २०२६

लोणार सरोवरातील माँ कमळजा देवी मंदिराचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
नगराध्यक्षा सौ. मीराताई भूषण मापारी यांच्या पुढाकारामुळे हा महत्त्वाचा प्रश्न लवकरच सुटणार असून, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी मलिक यांनी
दि. २८ जानेवारी रोजी नगराध्यक्षा सौ. मीराताई मापारी यांना याबाबत स्पष्ट आश्वासन दिले आहे.

योजनेनुसार लिफ्टच्या सहाय्याने सर्व आवश्यक साहित्य खाली नेण्यात येणार असून, माँ कमळजा देवी मंदिराची सखोल डागडुगी करण्यात येईल.
तसेच मंदिरामध्ये पाणी शिरू नये यासाठी मंदिरासमोर मजबूत संरक्षण भिंत उभारण्यात येणार आहे.

वन्यजीव विभागाच्या वतीने रामगया येथील पाणी लिफ्टद्वारे वर काढण्यात येणार असून, धारेचे पाणी सोडण्याबाबत आवश्यक परवानगी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
सरोवरातील वाढत चाललेल्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे.

या सर्व कामांमुळे येत्या ६ महिन्यांच्या आत माँ कमळजा देवी मंदिराची संरक्षण भिंत, डागडुगी पूर्ण करून भाविक भक्तांसाठी
पुन्हा दर्शन खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे माँ कमळजा देवी सेवा संघासह संपूर्ण लोणार शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी नगराध्यक्षा सौ. मीराताई मापारी, माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, तहसीलदार भूषण पाटील, माँ कमळजा देवी सेवा संघाचे सर्व सदस्य
आणि सरोवर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


📌 संबंधित बातम्या


👉 आपल्या परिसरातील बातम्या, समस्या व कार्यक्रम प्रसिद्धीसाठी Kattanews.in शी संपर्क साधा.

 

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरखेर्डा येथे प.पू. श्री प्रल्हाद महाराज जन्मोत्सव निमित्त भव्य रथोत्सव मिरवणूक

साखरखेर्ड्यात प.पू. श्री प्रल्हाद महाराज जन्मोत्सवाची सांगता; भव्य रथोत्सव मिरवणुकीने भक्तिमय वातावरण

लोणार सरोवर संकटात: कमळजा माता मंदिर वाचवण्यासाठी १००% लोणार बंद, व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोणार सरोवर संकटात: कमळजा माता मंदिर वाचवण्यासाठी १००% लोणार बंद, व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Union Minister Prataprao Jadhav appealing for sickle cell blood test at Rithad PHC Washim

“सिकलसेलमुक्त भविष्यासाठी रक्तचाचणी गरजेची!” – ना. प्रतापराव जाधव यांचे आवाहन

चिखलीतील साबळे हॉस्पिटलचा पहिला वर्धापन दिन कार्यक्रम

विश्वास आणि सेवेचा वर्षपूर्तीचा टप्पा: साबळे हॉस्पिटलचा पहिला वर्धापन दिन उद्या उत्साहात साजरा होणार

शिंदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; दोन कुत्र्यांची शिकार झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीती

शिंदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ! दोन कुत्र्यांची शिकार; संपूर्ण गावात भीतीचे वातावरण

Lonar Lake water level touching Kamalja Devi temple mask in Buldhana Maharashtra

lonar lake:लोणार सरोवरातील जलपातळी धोक्याच्या टप्प्यावर !कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श

Leave a Comment