हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

भरधाव टेम्पोची धडक; माय-लेकाचा जागीच मृत्यू, एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर

On: January 29, 2026 7:11 AM
Follow Us:
वरूड-कोनड रस्त्यावर टेम्पो मोटारसायकल अपघातात माय-लेकाचा मृत्यू

मेरा बु. | २८ जानेवारी २०२६

मजुरी करून घरी परतणाऱ्या माय-लेकावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना वरूड ते कोनड रस्त्यावर घडली. भरधाव वेगाने आलेल्या टेम्पो वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने आई-मुलाचा जागीच मृत्यू झाला.

मेरा बु. येथील मुस्लीम कुंटूबातील रुखसाना बी इसा शहा (वय ६५) व त्यांचा मुलगा इनुस शहा इसा शहा (वय ४२) हे दोघे चांडोळ गावात मजुरीचे काम आटोपून मोटारसायकलवरून घरी परत येत होते.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

दरम्यान समोरून भंगार भरलेला सुप्रो कंपनीचा टेम्पो (क्र. MH 25 AJ 489) भरधाव वेगाने येत असल्याचे दिसताच इनुस शहा यांनी मोटारसायकल रस्त्याच्या कडेला थांबवली. मात्र टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पोने थेट धडक देत माय-लेकावर पलटी मारली.

अपघात इतका भीषण होता की, इनुस शहा यांचा एक हात तुटून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची आई रुखसाना बी शहा वाहनाखाली दबल्या गेल्या.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत दोघांना चिखली येथील सावळे रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी इनुस शहा यांना मृत घोषित केले. रुखसाना बी शहा यांची प्रकृती गंभीर असल्याने नगर येथे रेफर करण्यात आले. उपचार सुरू असतानाच नगर येथे त्यांचीही प्राणज्योत मालवली.

विशेष म्हणजे याच कुटुंबावर एका वर्षापूर्वीच पती व एका मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. आता माय-लेकाच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण मेरा बु. गावात शोककळा पसरली आहे.

या प्रकरणी वृत्त लिहेपर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता. ही माहिती मृतकांचे नातेवाईक सांडू शहा, युसुफ तांबोळी व बिसमिल्ला आतार यांनी दिली.


👉 हे पण वाचा 


📢 Katta News सोबत राहा – ग्रामीण, सामाजिक आणि वास्तव बातम्यांसाठी.

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरखेर्डा येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी

७५ गावांच्या प्रवाशांचा प्रश्न कधी सुटणार? साखरखेर्ड्यात सुसज्ज बसस्थानकासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे साकडे

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते अभिनेत्री व पत्रकार किरण वाघ यांना साई प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करताना

शिर्डीत किरण वाघ यांचा दुहेरी गौरव! ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’

लोणार नगरपरिषदेत घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात निवेदन देताना डॉ. गोपालसिंह बछिरे व शिवसेना उ.बा.ठा. पदाधिकारी

घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

मेहकरमध्ये एका रात्रीत ज्वेलर्स आणि मेडिकल स्टोअरमध्ये धाडसी चोरी

मेहकर हादरले! ‘आज माझे दुकान… उद्या कोणाचे?’ एका रात्रीत ज्वेलर्ससह मेडिकल स्टोअर फोडले; व्यापाऱ्यांची उडाली झोप

मेहकर न्यायालयातील बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

न्याय देणाऱ्यांच्या दारातच भ्रष्टाचार! मेहकर न्यायालयात खळबळ; वॉरंट थांबवण्यासाठी बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

Leave a Comment