बुलढाणा |२५ जानेवारी २०२६
बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या स्प्रिंकलरच्या तांब्याच्या तोट्या चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी प्रभावी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून तब्बल 8 चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत सुमारे 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत दि. 22 जानेवारी 2026 रोजी या गुन्ह्यांची यशस्वी उकल केली. या कारवाईत देवराज युवराज पवार (वय 22) व उमेश राजु पवार (वय 25), दोघेही रा. मोहना खुर्द, ता. मेहकर या आरोपींना अटक करण्यात आली.
अटक आरोपींकडून सुमारे 80 हजार रुपयांच्या तांब्याच्या स्प्रिंकलर तोट्या जप्त करण्यात आल्या असून, संबंधित आरोपी सध्या जानेफळ पोलीस यांच्या ताब्यात आहेत. पुढील तपास जानेफळ पोलीस करीत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोनि. सुनिल अंबुलकर, पोउपनि प्रताप बाजड, पोहेकॉ. शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, पोकों. निलेश राजपूत, राजेंद्र गडकर, विकास देशमुख तसेच पोलीस स्टेशन जानेफळचे सपोनि अजिनाथ मोरे व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
हे पण वाचा
📢 अधिक स्थानिक व शेतकरी हिताच्या बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट देत राहा.










