बुलढाणा |२१ जानेवारी २०२६
ग्राहक हक्क, महिला ग्राहक संरक्षण आणि ग्राहक फसवणूक या मुद्द्यांवर बुलढाणा जिल्ह्यात महिलांची ताकद अधिक मजबूत झाली आहे. ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या महिला बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वर्षाताई सुनिल इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाउंडेशनमार्फत करण्यात आली असून त्यामुळे जिल्ह्यातील महिला ग्राहकांच्या हक्कांना नवे बळ मिळाले आहे.
या निवडीबद्दल विदर्भ अध्यक्ष सचिन खंडारे, विदर्भ पदाधिकारी सुनील अंभोरे, डॉ. गंगाराम उबाळे तसेच बुलढाणा जिल्हाध्यक्ष शालिकराम चव्हाण यांनी वर्षाताई इंगळे यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यात ग्राहक संरक्षण चळवळीला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
📢 Katta News
तुमच्याही ग्राहक हक्कांची पायमल्ली होत आहे का?
आजच तुमची बातमी, तक्रार किंवा सामाजिक प्रश्न Kattanews.in पर्यंत पोहोचवा.
सत्य, आवाज आणि न्यायासाठी कट्टा न्यूज!
🔗 Related News










