देऊळगावराजा |१६ जानेवारी २०२६
देऊळगावराजा तालुक्यात शेती विक्रीच्या नावाखाली १७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या शेती फसवणूक प्रकरणात देऊळगावराजा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. बनावट कागदपत्रे, खोटी माहिती आणि धमक्यांच्या आधारे हा शेती घोटाळा केल्याचा आरोप असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
फिर्यादी गणेश तुकाराम काकड (वय ३४, रा. गारगुंडी, ता. देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आंतरवली सराटी शिवारातील गट क्रमांक १०६ मधील ७० आर शेतजमीन विक्रीस उपलब्ध असल्याचे भासवून आरोपींनी संगनमताने व्यवहार केला. मात्र प्रत्यक्षात सदर शेतजमीन विक्रीस पात्र नसल्याचे निष्पन्न झाले.
या बनावट शेती व्यवहारासाठी फिर्यादीकडून १७ लाख रुपये घेण्यात आले. पैसे परत मागितल्यास खोट्या कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस दाखल करण्याची धमकी देत, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवितास धोका देण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पोउपनि परविन पटेल करत आहेत. ठाणेदार ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास चालू आहे.
👉 वाचा Kattanews.in वर
- शिंदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ! दोन कुत्र्यांची शिकार; संपूर्ण गावात भीतीचे वातावरण
- अंढेरात जळालेली दुचाकी बेवारस आढळली! बनावट नंबर प्लेट लावून गुन्हा लपवण्याचा संशय
📢 KattaNews सोबत रहा अपडेट
अशाच ग्रामीण, गुन्हेगारी आणि वास्तव बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या. बातमी आवडल्यास शेअर करा.










