हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

शिंदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ! दोन कुत्र्यांची शिकार; संपूर्ण गावात भीतीचे वातावरण

On: January 16, 2026 7:00 AM
Follow Us:
शिंदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; दोन कुत्र्यांची शिकार झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीती
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

साखरखेर्डा | १६ जानेवारी २०२६

गेल्या एक महिन्यापासून शिंदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सातत्याने वाढत असून नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदी परिसरात बिबट्याचा वावर यामुळे शेतकरी व ग्रामस्थ रात्री घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. मागील दोन दिवसांत  परिसरात बिबट्याच्या वावर अधिक तीव्र होत दोन कुत्र्यांची शिकार करण्यात आली आहे. त्यामुळे ही बाब संपूर्ण सिंदखेडराजा तालुक्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

मागील दोन दिवसांपासून शिंदी–मेरा बु शिवारात बिबट्याचा मुक्त वावर असल्याचे नागरिकांनी सांगितले. रात्रीच्या वेळेस गावालगत असलेल्या शेतांमध्ये बिबट्या फिरत असल्याने शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.गावातील शेतकरी प्रमोद खरात हे रात्री गोठ्यात गाईचे दूध काढण्यासाठी गेले असता अचानक त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. प्रसंगावधान राखत त्यांनी तात्काळ गोठ्यातून पळ काढून आपला जीव वाचवला.दरम्यान, दिनांक १० व १२ जानेवारी रोजी रात्री बिबट्याने शिंदी–मेरा बु परिसरात दोन कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले. या घटनेनंतर संपूर्ण शिंदी गावात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

याच कालावधीत शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या सलीम तांबोळी यांच्या मुलालाही बिबट्याचे दर्शन झाले. तसेच शिंदी, राताळी, पिंपळगाव सोनारा, दरेगाव आणि मेरा बु परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

सध्या कापूस वेचणी व तूर सोंगणीचा हंगाम सुरू असतानाही बिबट्याच्या भीतीमुळे मजूर कामावर जाणे टाळत आहेत. याचा थेट परिणाम शेती कामांवर होत आहे.

या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेत वनविभागाने तातडीने पंचनामा करून चौकशी करावी व बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.


👉 हे पण वाचा..


🟢  हे आवश्यक करा

अशाच स्थानिक, थेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला  Follow करा.

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरखेर्डा येथे प.पू. श्री प्रल्हाद महाराज जन्मोत्सव निमित्त भव्य रथोत्सव मिरवणूक

साखरखेर्ड्यात प.पू. श्री प्रल्हाद महाराज जन्मोत्सवाची सांगता; भव्य रथोत्सव मिरवणुकीने भक्तिमय वातावरण

नगराध्यक्षा मापारी यांच्या पुढाकाराने लोणार सरोवरातील माँ कमळजा देवी मंदिराचा प्रश्न मार्गी लागणार

लोणार सरोवर संकटात: कमळजा माता मंदिर वाचवण्यासाठी १००% लोणार बंद, व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोणार सरोवर संकटात: कमळजा माता मंदिर वाचवण्यासाठी १००% लोणार बंद, व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Union Minister Prataprao Jadhav appealing for sickle cell blood test at Rithad PHC Washim

“सिकलसेलमुक्त भविष्यासाठी रक्तचाचणी गरजेची!” – ना. प्रतापराव जाधव यांचे आवाहन

चिखलीतील साबळे हॉस्पिटलचा पहिला वर्धापन दिन कार्यक्रम

विश्वास आणि सेवेचा वर्षपूर्तीचा टप्पा: साबळे हॉस्पिटलचा पहिला वर्धापन दिन उद्या उत्साहात साजरा होणार

Lonar Lake water level touching Kamalja Devi temple mask in Buldhana Maharashtra

lonar lake:लोणार सरोवरातील जलपातळी धोक्याच्या टप्प्यावर !कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श

Leave a Comment