हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाने वाशिम–जालना नवीन रेल्वेलाईन! पालकमंत्री मकरंद पाटील यांना निवेदन

Follow Us:
राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाने प्रस्तावित वाशिम–जालना नवीन रेल्वे लाईन, सिंदखेडराजा, लोणार सरोवर आणि वाशीम मार्गाचा नकाशा
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

सिंदखेडराजा |‌१६ जानेवारी २०२६

सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) :
वाशिम–जालना नवीन रेल्वेलाईन राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाने निर्माण करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
वाशिम–जालना रेल्वेलाईन हा मार्ग मराठवाडा व विदर्भाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून,
या नवीन रेल्वे लाईन प्रस्तावासाठी सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टीच्या हेलीपॅडवर
पालकमंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांना निवेदन देण्यात आले.राष्ट्रमाता जिजाऊ माता जन्मोत्सवानिमित्त मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान
नानासाहेब तौर फाउंडेशनचे संचालक नानाभाऊ तौर व सामाजिक कार्यकर्ते
गजाननभाऊ दराडे यांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात जालना–सिंदखेड राजा–दुसरबीड–लोणार सरोवर–लोणी–वाशिम
असा सुमारे १५० किलोमीटर लांबीचा प्रस्तावित रेल्वे मार्ग
जनसामान्यांच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आणि लाभदायक आहे, हे स्पष्ट करण्यात आले आहे.

हा वाशिम–जालना रेल्वे प्रकल्प केवळ दळणवळणापुरता मर्यादित न राहता
मराठवाडा आणि विदर्भाच्या आर्थिक, औद्योगिक व पर्यटन विकासाला चालना देणारा ठरणार आहे.
लोणार सरोवर, जिजाऊंचे सिंदखेड राजा, देवगिरी किल्ला, वेरूळ लेणी,
जालना स्टील सिटी व ड्राय पोर्ट यांना जोडणारा हा मार्ग
नवीन पर्यटन संधी निर्माण करणारा ठरेल, असेही नमूद करण्यात आले.

हे पण वाचा.

भर शेतात बुटाने मारहाण, आता ‘बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याची’ धमकी! वाशिम कृषी विभागावर गंभीर आरोप

गेल्या पाच वर्षांपासून नानासाहेब तौर फाउंडेशनच्या वतीने
महाराष्ट्र शासन दरबारी या रेल्वे मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून,
आगामी काळात जनआंदोलन समितीच्या माध्यमातून ही मागणी अधिक तीव्र केली जाणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी निवेदन स्वीकारत
या नवीन रेल्वेलाईन प्रस्तावासाठी सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या पर्यटनविषयक महत्त्वाकांक्षी योजनेत समाविष्ट करून
केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाला आमदार मनोजभाऊ कायंदे,
रा.कॉ.पा. जिल्हाध्यक्ष ऍड. नाझेर काझी,
नगराध्यक्ष सौ. माधुरीताई शिपणे,
माजी नगराध्यक्ष देविदासभाऊ ठाकरे,
सुरेशभाऊ बुलकडे, पत्रकार व विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


👉 आपले मत नोंदवा

वाशिम–जालना नवीन रेल्वेलाईन प्रकल्पाबाबत आपले मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा
आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.


🔗 Related News

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment